घरदेश-विदेशप्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

प्रमोद सावंत यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ

Subscribe

गोव्याच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला प्रमोद सावंत यांची गोव्याच्या नव्या मुख्यमंत्री पदी निवड झाली आहे. रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनानंतर गोव्यामध्ये मुख्यमंत्री पदाच्या निवडीच्या हालचालींना वेग आला होता. अखेर काल रात्री उशिरा गोव्याच्या मुख्यमंत्री पदाचा तिढा सुटला प्रमोद सावंत यांची गोव्याच्या नव्या मुख्यमंत्री पदी निवड झाली आहे. रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी प्रमोद सावंत यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी प्रमोद सावंत यांना शपथ दिली. तर प्रमोद सावंत यांच्यासोबत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे सुदीन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे विजय सरदेसाई यांची उपमुख्यमंत्री पदी निवड झाली असून त्यानी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसंच मनोहर आजगावकर, रोहन खंवटे, गोविंद गावडे, विनोद पालयेकर, जयेश साळगांवकर, मावन गुदिन्हो, विश्वजित राणे, मिलिंद नाईक, निलेश काब्राल यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

- Advertisement -

पर्रिकरांमुळे मी राजकारणात 

दरम्यान, पक्षाने माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे ती मला सांभाळायची आहे. मी माझी जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडेल. मी जो काही आहे तो मनोहर पर्रिकर यांच्यामुळे असल्याचे, गोव्याचे नवे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मुख्यंमत्री झाल्यानंतर प्रतिक्रिया दिली आहे. मनोहर पर्रीकर हे मला राजकारणात घेऊन आले होते. त्यामुळे मी गोवा विधानसभेचे अध्यक्षपद सांभाळले तसेच आज माझी मुख्यमंत्रिपदी निवड झाली ती पर्रीकर यांच्यामुळेच झाली असल्याचे प्रमोद सावंत यांनी सांगितले.

कोण आहेत प्रमोद सावंत

प्रमोद सावंत हे गोवा विधानसभेचे सभापती असून व्यवसायाने ते आयुर्वेदिक डॉक्टर आहेत. विद्यमान गोवा विधानसभा भाजप आमदारांमधील पर्रिकरांनंतर आरएसएस केडरचे एकमेव आमदार आहेत. प्रमोद सावंत हे दोनवेळा साखळी मतदारसंघातून निवडून आले आहेत. काँग्रेसमधून जे नेते गेल्या वर्षभरात भाजपमध्ये आले, त्यांना मुख्यमंत्रीपद द्यायचे नाही, असे भाजपने ठरवले होते. प्रमोद सावंत हे भाजप पक्ष संघटनेमधून पुढे आलेले आहेत. सावंत हे मार्च २०१७ पासून गोवा विधानसभेचे सभापती आहेत. ते यापूर्वी कधी मंत्री झाले नव्हते. मात्र त्यांना आता थेट मुख्यमंत्री बनण्याची संधी मिळाली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -