घरदेश-विदेशचौकीदार चोर नही, चौकन्ना है

चौकीदार चोर नही, चौकन्ना है

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधींच्या 'चौकीदार चोर है', या टीकेला प्रत्युत्तर देत 'चौकीदार चोर नहीं चौकन्ना है' असं म्हटलं आहे.

काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष भारतीय सैनिकांचे खच्चीकरण कशासाठी करत आहेत. ज्या विधानांमुळे आपल्या शत्रूला फायदा होतो अशी विधाने त्यांच्याकडून केली जात आहेत, अशी टीका करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय हवाई दलाने पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राईकचे पुरावे मागणार्‍या विरोधकांना जोरदार टोला हाणला. यावेळी ‘चौकीदार चोर नहीं चौकन्ना है,’ असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर पलटवार केला आहे. दहशतवादाविरोधात एकजूट दाखवण्याची गरज असताना, दिल्लीत २१ पक्ष एनडीएविरोधात ठराव मांडत होते. देशातील नागरिक त्यांना माफ करणार नाहीत, असेही मोदी म्हणाले.

येथे झालेल्या एनडीएच्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पंतप्रधान मोदींसोबत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारही उपस्थित होते. ‘सर्व चौकीदार हे काही चोर नाहीत, पण फक्त ‘देशाचा चौकीदार’ चोर आहे,’ अशी बोचरी टीका अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली होती.यावर नरेंद्र मोदी यांनी ‘चौकीदार चोर नही चौकन्ना है,’ देशाला लुटणारे चौकीदारामुळे हैराण आहेत.

- Advertisement -

गेल्या महिन्यात भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईसंदर्भात पुरावे मागणार्‍यांवर नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली. तसेच, आता भारत आपल्या वीर जवानांच्या बलिदानावर गप्प बसत नाही, तर ‘चुन चुन के बदला लेता हैं’ असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आपली सुरक्षा दले देशात आणि सीमेपलीकडे कारवाई करून दहशतवाद नष्ट करत आहेत; त्याचवेळी देशातील काही लोक आपल्या सुरक्षा दलांचं खच्चीकरण करत आहेत, असे मोदी म्हणाले. यावेळी त्यांनी पाकिस्तानलाही थेट इशारा दिला. हा नवीन भारत आहे. आमच्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही. हा भारत गप्प बसणारा नाही, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -