दिल्ली मुंबई रेल्वे सुरू राहणार,रेल्वे मंत्रालयाने केला खुलासा

दिल्ली मुंबई रेल्वे सेवा बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही

railways clarify no cancellation of trains on mumbai delhi sector
दिल्ली मुंबई रेल्वे सुरू राहणार,रेल्वे मंत्रालयाने केला खुलासा

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. यामुळे दिल्ली, गुजरात सारख्या राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. लॉकडाऊनची घोषणा करताच दिल्ली मुंबई रेल्वेसेवा बंद होणार अशी माहिती सोशल मीडियावर फिरत होती.लोकांमध्ये या संबंधी गैरसमज निर्माण झाले होते.  यासंबंधी रेल्वे प्रशासनाकडून खुलासा करण्यात आला आहे. दिल्ली मुंबई रेल्वे सेवा चालू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दिल्ली मुंबई रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत अशी माहिती सोशल मीडियावरून समोर येत होती. या संबंधी रेल्वे प्रशासनाने खुलासा केला आहे. दिल्ली मुंबई रेल्वे सेवा बंद करण्याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही असे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. या संबंधीचे ट्विट रेल्वेकडून करण्यात आले. दिल्ली मुंबई रेल्वेसेवा पूर्वीप्रमाणे चालू राहणार आहे असे रेल्वे मंत्रायलयाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता दिल्ली मुंबई रेल्वे संदर्भात असलेले गैरसमज दूर झाले आहेत.

राजधानी दिल्लीमध्ये कोरोना रूग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे दिल्लीमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्याची वेळ आली आहे. दिल्लीत कोरोनाच्या रूग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्याचबरोबर दिल्लीतील प्रदूषणानानेही धोक्याची पातळी ओलांडली आहे. दिल्लीनंतर गुजरातमध्येही नाईट कर्फू लावण्यात आला आहे. गेल्या २४ तासात देशभरात कोरोनाचे ४८ हजार ८८२ नवे रूग्ण समोर आले आहेत. तर ५८४ लोकांचा मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – रेल्वेसोबत व्यवसाय सुरु करण्याची सुवर्णसंधी; मिळेल भरपूर उत्पन्न