घरदेश-विदेशराज्यसभा खासदार अमर सिंह यांचे निधन

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे निधन

Subscribe

राज्यसभा खासदार अमर सिंह यांचे निधन झाले आहे. ते किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर नुकतीच किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ते सिंगापूरमध्ये उपचार घेत होते. सिंगापूरच्या माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये ते दाखल होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योती मालवली. अमर सिंह यांनी ६४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

- Advertisement -

माजी समाजवादी पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार अमर सिंह गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. उत्तर प्रदेशातील प्रमुख नेत्यांमध्ये त्यांची गणना होत होती. जुलै २०१६ मध्ये ते राज्यसभेचे खासदार म्हणून निवडले गेले. तेव्हापासून ते राजकारणात काहीसे कमी सक्रिय होते. याच वर्षी त्यांचे किडनी प्रत्यारोपणाचे ऑपरेशनही करण्यात आले होते. प्रदीर्घ आजारामुळे त्यांच्यावर सिंगापूरमध्ये उपचार सुरु होते. अमर सिंह यांची उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी खासदार म्हणून निवड झाली होती. समाजवादी पक्षापासून फारकत घेतल्यानंतर ते राजकारणात काहीसे कमी सक्रिय होते. १९९६ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडले गेल्यापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली होती.

मार्च महिन्यात परदेशात उपचार सुरू असतानाच त्यांच्या निधनाची अफवा मीडियात पसरली होती. त्यावर त्यांनी ‘टायगर अभी जिंदा है’ असा व्हिडिओ मॅसेज सोशल मीडियावरून आपल्या हितचिंतकांना दिला होता. सिंगापूरमधून मी अमर सिंह बोलतोय. ‘आजाराने त्रस्त आहे. पण घाबरलेलो नाही. हिंमत अजून बाकी आहे, जोशी बाकी आहे आणि होशही बाकी आहे. माझ्या काही शुभचिंतकांनी आणि मित्रांनी अफवा पसरवली. यमराजने मला बोलावल्याची. असं काही झालेलं नाही. माझ्यावर उपचार सुरू आहेत’, असे अमर सिंह यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले होते.

- Advertisement -

हेही वाचा –

Delhi Corona: एका दिवसात १,११८ नव्या रूग्णांची नोंद; १ हजारांहून अधिकांना डिस्चार्ज

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -