रॉबर्ट वाड्राच्या चौकशीचा आज पाचवा दिवस

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याचे पती रॉबर्ट वाड्रा यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या मार्फत चौकशी सुरु असून या चौकशीचा आज पाचवा दिवस आहे.

Mumbai
robert_
रॉबर्ट वाड्रा आणि त्यांची आई

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी याचे पती रॉबर्ट वाड्रा यांची गेल्या काही दिवसांपासून ईडीच्या मार्फत चौकशी सुरु आहे. आज, मंगळवारी या चौकशीचा पाचवा दिवस असून आता ही चौकशी दिल्लीऐवजी राजस्थानमधील राजधानी जयपूर येथे होत आहे. आज ईडी रॉबर्ट वाड्रासह त्यांच्या आईचीही चौकशी करणार आहेत. दरम्यान, ही चौकशी बेहिशेबी मालमत्ता नव्हे तर बिकानेर भूखंडाच्या व्यवहाराबाबत होणार आहे. रॉबर्ट वाड्रा आणि त्यांच्याची ईडीच्या एकूण ११ अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार आहे. या अधिकाऱ्यांनी तब्बल ५५ प्रश्नांची यादी बनवली आहे. यामध्ये वाड्रा यांची कंपनी स्काय लाईट हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. च्या माध्यमातून जमिनीच्या खरेदी-विक्री प्रकरणातील पैशाच्या व्यवहाराबाबत चौकशी होणार आहे. दरम्यान, रॉबर्ट वाड्रा जयपूरच्या कार्यलयात दाखल झाले आहेत.

वाड्रांची होतेय मॅरोथॉन चौकशी

गेल्या काही दिवसांपासून रॉबर्ट वाड्रा यांची मनी लाँड्रिंगप्रकरणी मॅरेथॉन चौकशी सुरु आहे. बुधवार दुपारपासून रॉबर्ट वाड्रा यांची ईडीकडून कसून चौकशी सुरु असून तब्बल ५ तास सलग त्यांची चौकशी झाली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रॉबर्ट वाड्रा यांची जवळपास ९ तास चौकशी झाली. रॉबर्ट वाड्रा बुधवारी दुपारी चार वाजता ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. त्यांना सोडण्यासाठी प्रियांका गांधी आल्या होत्या. दिवसभर झालेल्या चौकशीनंतर रात्री १० वाजता त्यांची चौकशी पूर्ण झाली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी जवळपास ६ तासामध्ये त्यांना ४२ प्रश्न विचारले. लंडनमधील बेकायदेशीर मालमत्ता प्रकरणी वाड्रा यांची चौकशी करण्यात आली. वाड्रा यांच्यासोबत कार्ति चिदंबरमसह वकील देखील ईडीच्या कार्यालयात हजर होते. ३ अधिकाऱ्यांच्या टीमने वाड्रा यांची काल चौकशी केली होती. आता बिकानेर जमीन घोटाळा प्रकरणी चौकशी होत आहे.

हेही वाचा – 

रॉबर्ट वाड्रामुळे प्रियंका गांधी कोर्टात

रॉबर्ट वड्राच्या कंपन्यांवर ईडीचे छापे