घरदेश-विदेशमसूद अझहरचा मृत्यू

मसूद अझहरचा मृत्यू

Subscribe

पाकिस्तान माध्यमात चर्चा जैश-ए-मोहम्मदकडून इन्कार

भारताचा सर्वात मोठा शत्रू, जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मौलाना मसूद अझहर याचा मृत्यू झाल्याचे वृत्त पाकिस्तानातील स्थानिक मीडियाने दिले होते. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री कुरेशी यांनी, मसूद अझहर गंभीर आजारी असूून सरकारी हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर इलाज सुरु असल्याचे दोन दिवसांपूर्वीच म्हटले होते. त्यामुळे पाकिस्तानी मिडियाच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली होती. मात्र जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने त्याचा इन्कार केला असून अझहर तंदुरुस्त असल्याचे म्हटले आहे. १९९९ साली कंधहार विमान अपहरणात भारताने सोडलेला दहशतवादी हा मसूद अझहरच होता. त्याने त्यानंतर ‘जैश’ची स्थापना केली. मौलाना अझहर हा एअर स्ट्राईकमध्ये मारला गेला, असे म्हटले जात होते.

पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात भारतीय सीआरपीएफचे ४२ जवान शहीद झाले होते. हा हल्ला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केला होता. हा हल्ला करणारा भारतीय काश्मीरमधील दहशतवादी आदील भट्ट याला आत्मघाती हल्ला करण्यासाठी मौलाना मसूद अझहर याने तयार केले होते. इतकेच नव्हेतर बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण तळावर असे ४५ आत्मघाती दहशतवादी या मौलाना अझहरने तयार केले होते. ते सर्व भारतावर हल्ला करण्याच्या तयारीत होते. मात्र ही माहिती गुप्तचरांमार्फत भारतीय लष्कराला मिळाली. त्यानंतर भारताने बालाकोट येथील दहशतवादी तळावर एअर स्ट्राईक करण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० विमानांनी २६ तारखेला भल्या पहाटे बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण शिबिरावर हल्ला केला. यावेळी या प्रशिक्षण शिबिरावर १००० किलोचे बॉम्ब टाकण्यात आले. या हल्ल्यात संपूर्ण प्रशिक्षण शिबिर बेचिराख करण्यात आले. त्यात मौलाना मसूद अझहर गंभीररित्या जखमी झाल्याचे पाकिस्तानच्या स्थानिक मिडियाने म्हटले होते. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी दोन दिवसांपूर्वी सीएनएन या इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत, अझहर गंभीर आजारी असून त्याच्यावर इस्पितळात इलाज सुरू आहेत, असे म्हटले होते.

मात्र मागील काही दिवसांपासून मसूद अझहरची कोणतीही बातमी येत नव्हती. अझहर नेमका कुठे आहे, याबद्दल पाकिस्तानकडून कमालीची गुप्तता पाळली जात होते. रविवारी अझहरच्या मृत्यूची बातमी आली. त्यामुळे एकच हल्लकल्लोळ झाला. पण जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेने त्याचा इन्कार करताना अझहर तंदुरुस्त असल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -