घरदेश-विदेशसबिता यादवने भारतासाठी जिंकली दोन पदकं

सबिता यादवने भारतासाठी जिंकली दोन पदकं

Subscribe

सबिता यादव ही १७ वर्षाची असून, ती बौद्धिक अपंगत्वाबरोबरच नीटपणे बोलू शकत नाही. मात्र, दिव्यांग असूनही तिने एकेरी टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णुपदक पटकावले, तर दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत रौप्यपदक मिळले.

भारतीय महिला टेबल टेनिसपटू सबिता यादव हिने स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्स २०१९ या स्पर्धेत भारताला दोन पदके जिंकून दिले आहेत. सबिता यादव ही १७ वर्षाची आहे. सबिता ही बौद्धिक अपंगत्वाबरोबरच नीटपणे बोलू शकत नाही. मात्र, ती दिव्यांग असूनही एकेरी टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णुपदक पटकावले, तर दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत रौप्यपदक मिळले आहे. सबिता एका गरिब कुटुंबातील आहे. हिचे वडिल काही वर्षांपूर्वीच निधन पावले आहेत. तर तिची आई इतरांच्या घरात धुणी-भांडी, घरकाम, झाडू मारणे, साफसफाई करणे अशी कामे करते. पतीच्या निधनानंतर तिच्या आईने न खचता सबिताला आणि तिच्या कुटुंबाचा सांभाळ केला. तसेच सबितालाही सक्षम बनवले. सबिताच्या कुटुंबाची परिस्थीती कमकुवत असुनही तिला कुटुंबासाठी काहीतरी करून दाखवायच होत. त्यामुळेच विशेष ऑलिम्पिकची संधी मिळताच ती संधी हुकवली नाही, तर त्या संधीचे तिने सोनेही करून दाखवले आहे.

अशी घडली सबिता

सबिता यादव ही विशेष विद्यालयात शिकते. त्या विद्यालयात शिवणकाम आणि पाककला शिकवले जातात. तसेच त्या विद्यालयात अनेक गोष्टींचे प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. २०१५ मध्ये टेबल टेनिस या खेळात आपल्याला चांगली कामगिरी करता येईल अशी दिला जाणीव झाली. त्यानंतर तिने मेहनत घेऊन नुकतेच जागतिक स्थरावर भारताला दोन पदके मिळवून दिले. याबाबत सबिता हिच्या प्रशिक्षक शीतल नेगी यांनी प्रतिक्रिया दिली की, सबिता हिने तिच्या परिक्षमाने आणि मेहनतीने तिचे स्वप्न पूर्ण केल आहे. विशेष ऑलिम्पिक खेळांमधील खेळाडूंनाही जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्तर पार केल्यानंतरच आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळते. पण सबिताकडे चांगला आत्माविश्वास आहे. त्यामळेच तिने ही कामगिरी करून दाखवली आहे.

- Advertisement -

भारत पहिल्या क्रमांकावर

स्पेशल ऑलिम्पिक वर्ल्ड गेम्स २०१९ या स्पर्धेत सध्या भारताचा पहिला क्रमांक आहे. भारताच्या नावावर १६३ पदके आहेत. या पदकामध्ये ४४ सुपर्ण, ५२ रौप्य आणि ६७ कांस्यपदक पटकावले आहे. तर या स्पर्धेत चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -