नोटाबंदीनंतर काळा पैसा बाहेर आलाच नाही – शरद पवार

नोटाबंदीच्या दोन वर्षानंतर देखील काळा पैसा गेला कुठे? ही कुणीच सांगू शकत नाही अशा शब्दात शरद पवारांनी केंद्र सरकारवर टिका केली आहे.

Baramati
NCP Chief Sharad Pawar
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार

२०१६ साली भाजप सरकारनं केलेल्या नोटाबंदीच्या मुद्यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सरकारवर टिका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काही चुकीचे आर्थिक निर्णय घेतले. त्यामुळे किमान वर्षभर तरी देशात मंदीचे वातावरण पुढील वर्षभर कायम राहिल. पुढील निवडणुकीमध्ये सत्ताबदल झाला तर गुंतवणुकीबाबतचे चित्र बदलेल. अन्यथा अनेकांनी दिवाळे काढल्याच्या बातम्या आल्यास आश्चर्य वाटायला नको. अशा शब्दात शरद पवारांनी केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टिका केली. तसेच नरेंद्र मोदींनी आर्थिक निर्णय घेताना चुका केल्या. परिणामी देशात आर्थिक मंदीचे चित्र आहे. त्याचा परिणाम हा छोट्या उद्योजकांना होताना दिसत आहे.  तर, परकीय गुंतवणुकीला दरवाजे मोकळे  केले. परिणामी, छोट्या  व्यापाऱ्यांवर त्याचा विपरित परिणाम झाल्याचं देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नोटाबंदीवरून सरकारवर निशाणा

सरकारनं नोटबंदी तर केली पण त्याचा फायदा काय झाला? असा सवाल शरद पवारांनी केला. काळापैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी केली. पण ती पूर्णपणे फसली. अशा शब्दात शरद पवारांनी नोटाबंदीच्या निर्णयाचा समाचार घेतला. नोटाबंदीनं काळा पैसा बाहेर नाही आला किंवा दहशतवादी कारवाया देखील थांबल्या नाहीत. उलट लोकांना प्रचंड मनस्ताप झाला. नवीन नोटा छपाईसाठी अवाढव्य खर्च केला. चलनटंचाईमुळे बाजारात आर्थिक स्थिरता निर्माण झाली. त्यामुळे अर्थव्यवस्थेची वाटचाल देखील अवघड झाल्याची टीका यावेळी शरद पवारांनी केली. नोटाबंदीनंतर मोठ्या लोकांचं घबाड बाहेर येणार म्हणून अनेक जण खूश होते. पण स्विस बँकेनं खातेदारांची माहिती दिली नाही. नोटाबंदीच्या दोन वर्षानंतर देखील काळा पैसा गेला कुठे? ही कुणीच सांगू शकत नाही. तसेच देशाच्या सर्वोच्च संस्थेमध्ये सरकारचा वाढता हस्तक्षेप लोकशाहीच्या दृष्टीनं चिंताजनक असल्याची भीती देखील शरद पवारांनी बोलून दाखवली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here