Ayodhya Verdict : निकाल कोर्टाचा, सरकारचा नाही – राऊत

'निकाल कोर्टाचा, सरकारचा नाही', अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

Mumbai
shiv sena mp sanjay raut
शिवसेना खासदार संजय राऊत

‘अयोध्येत बाबरी मशीद पाडले गेले त्यावेळी कोणत्या पक्षाने मशीद पाडले असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावेळी कोणीही पुढे आले नाहीत, त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिका घेतली. त्या भूमिकेनंतर देशात हिंदुत्वाची लाट आली आणि त्याच लाटेवर आज अनेकजण उभे आहेत’, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही नेत्याचे नाव न घेता लगावला आहे.

राऊतांची भाजपवर टीका

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाल्यानंतर दररोज पत्रकार परिषदांचा धडाका लावणाऱ्या शिवसेनेचे खासदार संयज राऊत यांनी आजही पत्रकार परिषद घेऊन ‘अयोध्या’ प्रकरणी प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांनी सत्तेबाबतची ही पत्रकार परिषद नसल्याचे सांगितले. तर ही पत्रकार परित्मरद जन्मभूमी-बाबरी मशीद जमीन वादाबाबतच्या खटल्याच्या निकालाबाबत होती. मात्र, दररोज भारतीय जनता पक्षावर टीकेचे बाण चालवणाऱ्या राऊत यांनी अयोध्या खटल्याच्या निकालाच्या मुद्द्यावरूनही भारतीय जनता पक्ष आणि केंद्र सरकारलाच आपल्या टीकेचे लक्ष्य केले होते.

तसेच आज लागणाऱ्या निकालाचे श्रेय भारतीय जनता पक्ष किंवा केंद्र सरकारने घेऊ नये, असे अप्रत्यक्षपणे सांगितले. मात्र, राम मंदिर उभारणी झालीच तर त्यांचे श्रेय शिवसेना या पक्षाला असल्याचे देखील ते म्हणाले. त्यासोबतच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारने अध्यादेश काढून राम मंदिर बांधण्याचं काम सुरू करावं, अशी मागणी केली होती. त्यानंतर, सुप्रीम कोर्टाचा निर्णय स्वीकारण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होत आणि तेच आम्ही करतोय, असे राऊत म्हणाले. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा सर्वोच्च असून, तो मानला पाहिजे अशी भूमिका सर्वांनी घेतली आहे.


हेही वाचा – आज बाळासाहेब हवे होते – राज ठाकरे