घरदेश-विदेशपंजाब विधानसभेत सिद्धूची शाब्दिक चकमक

पंजाब विधानसभेत सिद्धूची शाब्दिक चकमक

Subscribe

पंजाब विधानसभेत सिद्धू आणि शिरोमणी अकाली दल या विरोधी पक्षासोबत शाब्दीक वादावाद झाला. तसेच सिद्धू यांच्या विरोधात घोषणाबाजी ही दिल्या.

जम्मू काश्मीर पुलवामा आत्मघातकी दहशदवादी हल्ल्यामध्ये सीएआरएफचे ४० हून अधिक जवान शहिद झाले. चारी दिशेला संत्पत वातावरण असताना भारताचे माजी क्रिकेटपटू आणि पंजाब सरकारचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी झालेल्या दहशदवादी हल्ल्या बद्दल असे व्यक्तव केले की, पाकिस्तानशी चर्चा करुन तोडगा काढावा. दहशतवादाला धर्म, देश नसतो. या व्यक्तवानंतर सोशल मीडियावरुन त्यांच्यावर टीका होऊ लागली. नवज्योत सिंग सिद्धू यांना सोनी टीव्हीवरील ‘दि कपिल शर्मा शो’ मधून काढून टाकण्यात आले. आज, सोमवारी सकाळी पंजाब विधानसभेमध्ये शिरोमणी अकाली दलाच्या या विरोधी पक्षाच्या आमदारांनी नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर प्रखर विरोध केला.

अकाली दलाचे आमदार बिक्रम सिंग मजिठिया यांच्याबरोबर सिद्धू यांची शाब्दिक वादावादी झाली. सिद्धू यांना मंत्रीपदावरुन हटवावे ही विरोधी पक्षाची मागणी आहे. पंजाब विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी मजिठिया यांच्या नेतृत्वाखाली नेत्यांनी सिद्धू यांच्या पाकिस्तानी भेटीचा फोटो सुद्धा जाळला. पाकिस्तानी लष्कर प्रमुख यांच्या सोबत गळाभेट करतानाचे हे फोटो होते. विधानसभेत सिद्धू यांच्यावर विरोधात विरोधी पक्षाकडून जोरदार घोषणाबाजीसुद्धा करण्यात आल्या. नवज्योत सिंग सिद्धू बोलत अलताना ही घोषणाबाजी या चालूच होत्या.

- Advertisement -

मजिठिया हे पत्रकारांशी बोलताना, मागच्या वर्षी नवज्योत सिंग सिद्धू हे इम्रान खानच्या शपथविधीसाठी पाहुणे म्हणून पाकिस्तानात गेले होते तर या संपूर्ण वादावर आम्हाला काँग्रेस आणि पंजाब सरकारची काय स्पष्ट भूमिका आहे ते समजले पाहिजे? तसेच पाकिस्तानचे लष्करप्रमुख आणि पंतप्रधान इम्रान खान यांचा निषेध करणार का? अशा प्रकारचे प्रश्न उपस्थित झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -