धक्कादायक! घराला कित्येक दिवस टाळं; दार उघडलं आणि…

संपूर्ण घराचा शोध घेतला जात असून या घटनेचे नेमके कारण शोधण्याचा तपास सुरू आहे.

ओडिशाच्या बलांगिरी जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेमुळे ओडिशाच्या बलांगिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका घरातून एकाच कुटुंबातील ६ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या मृतांमध्ये ४ मुलेही आहेत. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत आणि मृत्यूच्या कारणांचा शोध अद्याप सुरू आहे. तर हा खून आहे की आत्महत्या हे अद्याप स्पष्ट झाले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

असा घडला प्रकार

पटणागड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सानरापाडा गावात वयवर्ष ५० असणारे बुलू जानी, त्यांची ४८ वर्षीय पत्नी ज्योती आणि त्यांची दोन मुलं आणि दोन मुली यांचे मृतदेह आढळून आले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहेत. मुलांचे वय दोन ते १२ वर्षे असल्याचे सांगितले आहे. पटणागड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा खून की आत्महत्या हे अद्याप समजू शकलेला नाही आहे. ही घटना घडल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. संपूर्ण घराचा शोध घेतला जात असून या घटनेचे नेमके कारण शोधण्याचा तपास सुरू आहे.

यासह स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, कित्येक दिवस बंद होते. तर काहींनी ते बंद घर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र घर उघडत नसल्याने स्थानिकांनी पोलिसांची मदत घेतली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी या बंद असलेल्या घरातच ६ मृतदेह आढळून आले.


आता कोरोनाची भिती नष्ट; ३० सेकंदात CoronaVirus होणार नाहीसा, संशोधकांचा नवा शोध