पत्नीचे अनैतिक संबंध, पतीने मुलांसमोरच चिरला गळा!

murder case
प्रातिनिधिक छायाचित्र

राजस्थानमधील जयपूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत असा संशय पतीला आला. त्यामुळे पतीने रागाच्या भराच आपल्या मुलांसमोरच बायकोचा गळा चिरला. तर पतीला सासूने पाठिंबा दिला असं म्हणत त्याने सासूचीही हत्या केली. त्यानंतर स्वत: पोलिसात जाऊन आत्मसमर्पण केलं.

रामकिशन सैनी असे आरोपीचे नाव आहे. सैनीचे लग्न मंजू सैनीशी झाले होते आणि या दोघांना तीन मुलेही आहेत. आरोपीच्या सासूचे नाव गौर देवी असे आहे. सैनी आणि त्याचे कुटुंब चांदलाई रोडवरील शिवम कॉलनी येथील तिच्या सासरच्या घरी राहतात. सोमवारी पहाटे १च्या सुमारास सैनीने पत्नी आणि सासूचा गळा चिरला.

या घटनेनंतर सैनी आपल्या मुलांसह चाकसू पोलिस स्टेशनमध्ये गेला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तेथून त्याला शिवदासपुरा पोलिस ठाण्यात नेण्यात आले. शिवदासपुरा स्थानकात आरोपींनी आपल्या मुलांसमोर पुन्हा गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडताळणी करण्यासाठी पोलिसांचे एक पथक सैनीच्या घरी दाखल झाले, अशी माहिती हिंदुस्तान टाईम्सने दिली आहे. पोलिसांनी मंजु आणि गौरा देवी यांचे मृतदेह घरातून ताब्यात घेत आरोपीला ताब्यात घेतले आहे.


हे ही वाचा – बलात्कार करणाऱ्याला सर्वांसमोर फाशी द्यायला हवी – इम्रान खान