घरट्रेंडिंगTelangana result 2018: ओवेसींचा सलग पाचवा विजय

Telangana result 2018: ओवेसींचा सलग पाचवा विजय

Subscribe

अकबरद्दिन ओवेसी हे १९९९ पासून  'चंद्रयानगुट्टा' मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत.

तेलंगणा विधानसभा निवडणुकीतील आतापर्यंतच्या मतमोजणीनुसार, तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) आघाडीवर आहे. तर हैदराबादमधून एमआयएमचे अकबरुद्दीन ओवेसी विजयी झाले आहेत. दरम्यान, अकबरुद्दीन ओवेसी यांचा हा सगल पाचवा विजय आहे. ‘चंद्रयानगुट्टा’ या त्यांच्या मतदारसंघातून ओवेसी सलग पाचव्यांदा विजयी झाले आहेत. अकबरुद्दिन ओवेसी यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेद्वारावर बहुमताने मात केलं असून, त्यांच्या झोळीत एकूण ७३ हजार ९९२ मतांचं दान पडलं आहे. ओवेसींचे प्रतिस्पर्धी असलेले भाजपचे शाहेजादी सय्यद यांना केवळ ११ हजार ७०८ मतं तर, टीआरएसचे एम. सिताराम रेड्डी यांना १० हजार ६८० मतं मिळाली आहेत. अकबरद्दिन ओवेसी हे १९९९ पासून एमाआयएम पक्षाकडून, ‘चंद्रयानगुट्टा’ मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, १९९९ पासून ते २०१८ पर्यंत सलग पाचव्यांदा अकबरुद्दिन ओवेसींनी विजय प्राप्त केला आहे. अकबरुद्दिन हे एमआयएमचे अध्यक्ष असवुद्दिन ओवेसी यांचे धाकटे बंधू आहेत.

तेलंगणात टीआरएसला बहुमत

तेलंगणात टीआरएस आणि एमआयएम युतीने बहुमताचा आकडा पार केला आहे. टीआरएस सध्या ८२ जागांवर आघाडीवर आहे. टीडीपी-काँग्रेस युतीला २५, भाजपा ६ तर इतर ६ जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे तेलंगणात पुन्हा एकदा टीआरएस-एमआयएम सत्तेवर बसणार असल्याची शक्यता दिसून येत आहे. दरम्यान, हा विजय प्राप्त केल्यामुळे  हैदराबादमध्ये टीआरएसच्या कार्यकर पक्षाच्या मुख्यालयाबाहेर जल्लोष करताना दिसत आहेत.

- Advertisement -

वाचा : तेलंगणात टीआरएस सत्ता बसवणार?

वाचा : अकबरुद्दीन यांनी पंतप्रधान मोदींना दिलेली धमकी 


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -