घरदेश-विदेशतेलगू चित्रपटाच्या लक्ष्मीकांत बेर्डेचा 'या' पक्षात प्रवेश

तेलगू चित्रपटाच्या लक्ष्मीकांत बेर्डेचा ‘या’ पक्षात प्रवेश

Subscribe

तेलगू चित्रपटाचा लक्ष्मीकांत बेर्डे अर्थात अलीने वायएसआर काँग्रेस या पक्षात प्रवेश केला आहे. तो गेल्या ४० वर्षांपासून तेलगू चित्रपटसृष्टीत काम करत आहे. महाराष्ट्रात जशी लक्ष्मीकांत बेर्डेंची लोकप्रियता आहे, अगदी तशीच लोकप्रियता कॉमेडियन अलीला दक्षिण भारतातील राज्यांमध्ये आहे.

तेलगू चित्रपटसृष्टीचा लक्ष्मीकांत बेर्डे अर्थात अलीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वायएसआर काँग्रेस या पक्षात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अलीने राजकारणात प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर त्याने आपला जवळचा मित्र अभिनेता पवन कल्याण याला साथ देणार असे म्हटले होते. आपली राजकीय कारकिर्दिची सुरुवात आपण पवन कल्याण याची पार्टी जन सेना पार्टी या पक्षापासून करणार असे म्हटले होते. परंतु, अलीने तसं केलं नाही.

…तरीही चंद्रबाबूंना साथ दिली नाही

अली हा गेल्या ४० वर्षांपासून तेलगू चित्रपटसृष्टीमध्ये कार्यरत आहे. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डेला लोकप्रियता आहे, अगदी तशीच लोकप्रियता अलीची तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी अली तेलगू देसम पार्टीच्या काही कार्यक्रमांमध्ये दिसला होता. २० जानेवारीला तेलगू देसम पार्टीचे अध्यक्ष आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी अलीच्या निवासस्थानी जाऊन त्याची भेट घेतली होती. अलीचे तेलगू चित्रपटसृष्टीत ४० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमालाही चंद्राबाबू नायडू उपस्थित होते. परंतु, तरीही अलीने चंद्राबाबू नायडू यांची तेलगू देसम पार्टीमध्ये प्रवेश न करता जन सेना पार्टीत प्रवेश करुन राजकारणात एंट्री मारली.

- Advertisement -

‘हे लाखो तेलगूंचे स्वप्न’

गेल्या जानेवारी महिन्यात श्रीककुलम येथे वायएसआर काँग्रेस पक्षाची प्रजा संकल्प यात्रा आयोजित करण्यात आली होती. या यात्रेदरम्याने अलीची भेट वायएसआर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांच्याशी झाली. त्यावेळी त्याने सभेत म्हटले होते की, ‘जगनमोहन यांचे स्वप्न हे लाखो तेलगू लोकांचे स्वप्न आहे.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -