तर पुलवामा सारखे हल्ले होतच राहतील – फारूख अब्दुल्ला

पुलवामाच्या हल्ल्यासाठी काश्मीरी जनता जवाबदार नाही असे वक्तव्य जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केले आहे.

Jammu - kashmir
farooq abdullah

काश्मीर येथील पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्लयांनतर देशात संतापाची लाट आहे. देशातच नाही तर जगभरात या घटनेची निंदा केली जात आहे. यादरम्यान जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी एक वक्तव्य केले आहे. दहशतवादी हल्ल्यासाठी काश्मीरमधील नागरिक जवाबदार नसल्याचे त्यांनी वक्तव्य केले आहे. जो पर्यंत काश्मीरच्या प्रश्नाचे काही समाधान कारक उत्तर मिळत नाही तो पर्यंत असे हल्ले होत राहणार असेही ते म्हणाले. सीआरपीएफचे ४० जवान शहिद झालेत यामध्ये काश्मीरच्या सामान्य माणसाची कोणतीही भूमिका नसल्याचे त्यांनी सांगितले. काश्मीरी लोकांच्या समुदायाला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. शुक्रवारी कर्फू लागल्यावर  फारूख अब्दुल्ला हे आपल्या घराजवळ असलेल्या मशिदीत राहत आहेत.

काय म्हणाले फारूख अब्दुल्ला

“दहशतवादी हल्ल्याना आम्ही जवाबदार नाही. मी बैठकीत यापूर्वीही हेच सांगितले होते. तुम्ही आमच्या मुलांना निशानाबनवणून आमच्या समस्या अजून वाढवत आहात. आम्ही वाईट परिस्थीतीमध्ये फसले आहोत. आमचा दहशतवादी संघटनांशी कोणताही संबध नाही.” – फारूख अब्दुल्ला

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here