Atul Tunnel मोदींच्या उद्घाटनानंतर २४ तासांत ३ अपघात; सेल्फी काढताना गेला जीव

three accidents in 24 hours after Modi's inauguration of Atul Tunnel

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९.०२ किमी लांबीच्या अटल बोगद्याचं उद्घाटन करुन तीन दिवस झाले असतानाच अपघातांची मालिका सुरु झाली आहे. जगातील सर्वात लांब बोगद्याचं उद्घाटन झाल्यानंतर पर्यटक येऊ लागले आहेत. परंतु, ते नियमांचं पालन न करता वेगाने गाड्या चालवत आहेत. यामुळे बोगद्याच्या उद्घाटनानंतर २४ तासांत तीन अपघात झाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३ ऑक्टोबरला बोगद्याचं उद्घाटन केलं होतं. मात्र, दुसर्‍याच दिवशी निष्काळजीपणाने वाहन चालवून सेल्फी घेत, एकमेकांसोबत शर्यत, यामुळे तीन अपघात झाले आहेत. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (बीआरओ) ने एका दशकाच्या अथक परिश्रमानंतर १० हजार फूट उंचीवर बोगदा तयार केला आहे. बोगद्यात वाहन चालकांवर नजर ठेवण्यासाठी पोलीस तैनात न केल्याबद्दल बीआरओने स्थानिक अधिकाऱ्यांवर सोमवारी ठपका ठेवला. मात्र बीआरओने आक्षेप घेतल्यानंतर राज्य सरकारने पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.

पीएमओच्या (पंतप्रधान कार्यालयाच्या) माहितीनुसार अटल बोगदा हा जगातील सर्वात लांब बोगदा आहे. ९.०२ किमी लांबीच्या बोगद्यामुळे मनालीला लाहौल स्पीती खोऱ्याला वर्षभर जोडलं जाईल. हिमालयाच्या पीर पंजाल पर्वतरांगामध्ये अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार मीटर उंचीवर बोगदा तयार करण्यात आला आहे. जगातील सर्वात लांब बोगदा आहे. अटल बोगद्याचे दक्षिणेकडील पोर्टल ३,०६० मीटर उंचीवर मनालीपासून २५ कि.मी. अंतरावर आहे, तर उत्तर पोर्टल लाहौल खोऱ्यातील तेलिंग, तासू, सिसू गावाजवळ ३,०७१ मीटर उंचीवर आहे.