घरदेश-विदेशKerala Flood : UAE ची केरळला ७०० कोटींची मदत

Kerala Flood : UAE ची केरळला ७०० कोटींची मदत

Subscribe

UAE ने केरळला ७०० कोटींची मदत देऊ केली आहे. पुराने उद्धवस्त झालेली देवभूमि केरळ आता कुठे सावरायला लागली आहे.

पुरामुळे उद्धवस्त झालेल्या केरळला आता परदेशातून देखील मदतीचा हात पुढे करण्यात आला आहे. युएई अर्थात संयुक्त अरब अमिरातीने केरळला ७०० कोटी रूपयांची मदत केली आहे. केरळचे मुख्यमंत्री पीनरयी विजयन यांनी स्वत: ही माहिती दिली. केरळला कोणत्या प्रकारची मदत करता येईल यासाठी युएईने राष्ट्रीय आपत्कालीन समिती स्थापन केली होती. युएईमधील मानवतावादी संघटनांचे प्रतिनिधी या समितीमध्ये आहेत. त्यानंतर केरळला युएईने ७०० कोटींची मदत जाहीर केली आहे.

केरळ युएई कनेक्शन

पुरग्रस्त केरळचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. केरळमधील २० लाख लोक रोजगारानिमित्त युएईंमध्ये राहतात. युएईच्या लोकसंख्येशी तुलना करता लोकसंख्येचे हे प्रमाण २७ टक्के इतके आहे. दोनच दिवसांपूर्वी युएईचे उपाध्यक्ष शेख मोहम्मद यांनी ट्विटरच्या माध्यमातून युएईच्या नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यासोबत त्यांनी केरळमधील फोटो देखील ट्विट केले आहे. त्यानंतर केरळला ७०० कोटींची मदत जाहीर करण्यात आला आहे.

- Advertisement -
वाचा – केरळवासियांच्या मदतीला धावले ‘इस्रो’

मदतीचा ओघ

पावसामुळे उद्धवस्त झालेल्या केरळचे हजारो कोटींचे नुकसान झाले आहे. हजारोंच्या संख्येनं संसार वाहुन गेले आहेत. लाखो लोक रिलिफ कॅम्पमध्ये राहत आहेत. त्यामुळे केरळला सावरण्यासाठी देशभरातून मदतीचे हात पुढे आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर केरळला ५०० कोटींची मदत जाहीर करण्यात आली. महाराष्ट्राने देखील १०० कोटींची मदत जाहीर करत १०० डॉक्टरांचे एक पथक देखील केरळला रवाना केले. प्रत्येक राज्यानं केरळला मदत देऊ केली आहे. शिवाय, काही सामाजिक संस्था देखील मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. सध्या तरी पावसानं काहीशी उसंत घेतली आहे. परिणामी पाणी ओसरायला सुरूवात झाली आहे. त्यामुळे मदतकार्याला देखील वेग आला आहे.

वाचा – केरळला महाराष्ट्राचा मदतीचा हात
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -