घरदेश-विदेशउबर टॅक्सीत 'मुका' घेणारे प्रवासी पुढील प्रवासाला मुकणार

उबर टॅक्सीत ‘मुका’ घेणारे प्रवासी पुढील प्रवासाला मुकणार

Subscribe

उबर कंपनीने एक नवीन नियमावली बनवली आहे. यामध्ये प्रवासादरम्यान असभ्य वर्तन करणे किंवा चालकाला मारण्याचा प्रयत्न केल्यास त्या प्रवाशाचे अकाऊंट कायमचे ब्लॉक करण्यात येणार आहे.

तरुण जोडप्यांना किस करण्यासाठी अनेकदा टॅक्सी किंवा रिक्षाची मदत घ्यावी लागते. प्रवासादरम्यान किस करताना अनेक जोडपे आपल्याला आढळतात. अशा असभ्य वर्तन करणाऱ्या जोडप्यांवर आता उबर बंदी घालणार आहे. उबरने आपल्या नवीन नियमावलीत या बद्दल कडक नियम बनवले आहेत. उबर प्रवासादरम्यान अनेक घटना घडतात त्यामुळे ही नवीन नियमावली बनवण्यात आली आहे. काही घटनांमध्ये प्रवाशांची चुकी असल्याचे आढळून आले मात्र त्याची कारवाई चालकावर होते. म्हणून प्रवासादरम्यान काही घटना घडू नये याची काळजी घेण्यासाठी ही नवीन नियमावली बनवण्यात आली आहे. या नियमावलीमुळे येत्या काळात दोषीवरच कारवाई केली जाणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केलं आहे.

काय आहेत नवी नियम

उबरने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ही गाइडलाइन प्रकाशित केली आहे. या नियमांअतर्गत प्रवाशांनी प्रवासादरम्यान टॅक्सीमध्ये अश्लील वर्तन करू नये, टॅक्सी चालकाला धमकी देऊ नये, टॅक्सी चालकाला मारहाण, टॅक्सी चालकानेही ग्राहकाशी अधिक जवळीक साधन्याचा प्रयत्न असे नियम बनवण्यात आले आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास चालक आणि प्रवासी दोघांवर कारवाई होऊ शकते.

- Advertisement -

“उबर कंपनीने तयार केलेल्या नियमांचे उल्लंघन केलेयास उबर प्रवाशांवर करवाई होणार आहे. अनेकदा अशा घटना घडल्या ज्यामध्ये प्रवाशांची चुकी होती मात्र याचा फटका चालकाला लागला म्हणून नियमांमध्ये बदल करण्यात आला.” – प्रभाजित सिंग,उबर हेड 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -