केंद्राने सांगितलं, कंगनाला Y+ दर्जाची सुरक्षा देण्याचं खरं कारण

ही सुरक्षा पुरवण्यामागचं खरं कारण केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले आहे

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि बॉलिवूड क्विन अभिनेत्री कंगना राणावत यांच्या शाब्दिक ट्विटर वॉर रंगल्याचे दिसत होते. या शाब्दिक युद्धानंतर कंगना मुंबईत ९ सप्टेंबर रोजी येणार असल्याचे कंगनाने स्वतः ट्विट करून माहिती दिली होती. मात्र झालेल्या शाब्दिक युद्ध, उत्तर-प्रत्युत्तरामुळे मुंबईत येताना अभिनेत्री कंगना रणावतला केंद्र सरकारकडून Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. मात्र कंगनाला केंद्र सरकारकडून Y+ दर्जाची सुरक्षा पुरवल्यानंतर अनेकांनी त्यावर प्रश्न उपस्थित केला तर काहींनी टीकासुद्धा केली. तिला ही सुरक्षा पुरवण्यामागचं खरं कारण केंद्रीय गृहराज्य मंत्री जी. किशन रेड्डी यांनी सांगितले आहे. कंगनाच्या सुरक्षेबाबत तिच्या वडिलांनी हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिल्याचं रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे.

कंगनाने मुंबईबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर तिच्यातील आणि शिवसेनेतील वाद शीगेला पोहोचला. मुंबईत येऊ नकोस अशा धमक्या अनेकांनी दिल्यामुळे त्यांना आव्हान देत ९ सप्टेंबर रोजी मुंबईला येणार असल्याचे कंगनाने स्पष्ट केले. त्यापूर्वी तिला Y+ दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली.

असं म्हणाली होती कंगना…

”मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा.” असं कंगनाने धमकावणाऱ्यांना प्रत्युत्तर दिले आहे. कंगनाने खुल आव्हान देत म्हणाली की, ”९ सप्टेंबर रोजी मी मुंबईत येईन. मुंबईत विमानतळावर उतरण्याआधी वेळ सांगेन. सोशल मीडियावरून धमक्या देणाऱ्यांपैकी कुणामध्ये हिंम्मत असेल तर रोखून दाखवा…”

कंगनाने महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या टीकेवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनाला चांगलेच सुनावले. यासह मुंबईत भीती वाटत असेल तर तिनं परत येऊ नये, असेही राऊत कंगनाला म्हणाले होते. यावरच कंगनाने राऊतांना प्रत्युत्तर दिले आहे. हे प्रत्युत्तर देताना पुन्हा एकदा कंगनाने ट्विट केले असून त्यात ती म्हणाली, “शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला धमकी दिली आणि पुन्हा मुंबईत परत येऊ नये असे म्हटले. यापूर्वी मुंबईच्या रस्त्यांवर स्वातंत्र्याच्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. ही मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?”


कंगना रानौतला वाय-प्लस सुरक्षा