घरताज्या घडामोडीVideo : बंदूक घेऊन माथेफिरुचा छतावर डान्स; सुरक्षारक्षकावर केला गोळीबार

Video : बंदूक घेऊन माथेफिरुचा छतावर डान्स; सुरक्षारक्षकावर केला गोळीबार

Subscribe

हातात बंदूक घेऊन छतावर डान्स करणाऱ्या माथेफिरुच्या गोळीबारात बँकेचा सुरक्षारक्षक जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी माथेफिरुला अटक केली आहे.

हातात बंदूक घेऊन छतावर डान्स करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या तरुणाच्या बंदूकीतून सुटणारी गोळी एका सुरक्षारक्षकाला लागल्याने त्यात सुरक्षारक्षकावर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर सध्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. विशेष म्हणजे दोन तासाच्या डान्सनंतर या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना उत्तर प्रदेशमधील मेरठ येथे घडली आहे.

नेमके काय घडले?

एक तरुण घराच्या छतावर हातात बंदूक घेऊन नाचत होता. तसेच तो माथेफिरु असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या माथेफिरुच्या बंदूकमधील गोळी सुटली आणि सिंडीकेट बँकच्या सुरक्षारक्षकाला लागली. यामध्ये ते जखमी झाले असल्याचे वृत्त समोर आले आहे.

- Advertisement -

का केला गोळीबार

डीजे वाजवण्याच्या मागणीवरुन हा तरुण गोळीबार करीत असल्याचे सांगण्यात येत आहे. डीजे लावला नाही तर गोळीबार करेन अशी धमकी हा माथेफिरू देत होता. स्थानिकांनी त्याचा गोंधळ ऐकून खाली उतरण्याची विनंती केली. मात्र माथेफिरूने कोणाचेही न ऐकता अखेर गोळीबार सुरू केला. यामध्ये बँकेच्या सुरक्षारक्षकाच्या हाताला गोळी लागल्याने ते जखमी झाले आहेत. यापूर्वी देखील या तरुणाने डीजेच्या मागणीवरुन गोळीबार केल्याचे समोर आले होते.

- Advertisement -

या माथेफिरुला यापूर्वीही गोळीबार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र, जामिनावर हा तरुण बाहेर होता. आता पुन्हा एकदा छतावर डान्स करताना माथेफिरुने गोळीबार केला असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.


हेही वाचा – कोरोनाचं नवं रूप! चार वेळा निगेटिव्ह आल्यानंतरही शरिरात आढळले अँटीबॉडी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -