घरदेश-विदेशउझबेगिस्तानमध्ये गायले 'इचक दाना पिचक दाना'

उझबेगिस्तानमध्ये गायले ‘इचक दाना पिचक दाना’

Subscribe

परराष्ट्र मंत्री सुषमा उझबेगिस्तान दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यानचा हा व्हिडिओ असून परराष्ट्र विभागाकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात एक महिला 'इचक दाना पिचक दाना' गाणं गातेय.

हिंदी गाण्यांचे वेड जगभरात आहे, हे माहित आहे. पण तरी देखील याची प्रचिती आली ती उझबेगिस्तानमध्ये. एक महिला ‘इचक दाना पिचक दाना’ हे गाणं गातानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ही महिला उझबेगिस्तानची कशावरुन असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हे खरं आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा उझबेगिस्तान दौऱ्यावर होत्या. या दौऱ्यादरम्यानचा हा व्हिडिओ असून परराष्ट्र विभागाकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात एक महिला ‘इचक दाना पिचक दाना’ गाणं गातेय.

- Advertisement -

काय आहे व्हिडिओ?

उझबेगिस्तानमधील एक महिला सुषमा स्वराज यांच्यासोबत असून ती हिंदी गाणं गात आहे. बॉलीवूडची क्रेझ संपूर्ण जगात आहे. आताच नाही तर फार पूर्वीपासून हिंदी गाण्यांची परदेशी नागरिकांना आवड असल्याचे या व्हिडिओतून दिसून आले आहे. हा व्हिडिओ परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करत त्याला छान कॅप्शन दिली आहे, ‘Bollywood knows no boundaries! More so in Uzbekistan where Raj kapoor and Nargis are household names. Salute to this Uzbek woman for her spirit as she hums the song ‘इचक दाना बीचक दाना’ from the classic Shri 420!’

श्री ४२० सिनेमातील गाणं

श्री ४२० हा सिनेमा राज कपूर यांचा सिनेमा. १९५५ साली हा सिनेमा रिलीज झाला. या सिनेमाची कथाही अगदी वेगळीच होती. गरीबीतून आलेला ‘राज’ त्याच्या हातचलाखीमुळे तो कुठच्या कुठे पोहोचतो. हे दाखवणारा हा सिनेमा आहे. आर. के. स्टुडिओ या राज कपूर याच्या स्वत:च्या प्रोडक्शन हाऊसचा हा सिनेमा असून पहिल्यांदाच राज कपूरची मुले रणधीर, राजीव आणि ऋषी कपूर या गाण्यातून दिसली होती. या सिनेमातील सगळीच गाणी हिट होती. ‘प्यार हुआ इकरार हुआ’, ‘इचक दाना पिचक दाना’, ‘मुड मुड के ना देख’, ‘रमय्या वस्तवय्या’ ही गाणी प्रसिद्ध होती.

- Advertisement -

(सौ- शेमारु)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -