घरदेश-विदेशजनतेचा कौल मान्य - वसुंधरा राजे

जनतेचा कौल मान्य – वसुंधरा राजे

Subscribe

राजस्थानमध्ये बीजेपीचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी मुख्यमंत्री पदावरून राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल कल्याण सिंग यांना सोपवराला. 

राजस्थान येथे काँग्रेस कडून भाजपाचा पराभव झाल्यानंतर राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी राजीनामा दिला आहे. आपल्याला जनतेचा कौल मान्य असल्याचे त्यांनी राजीनामा देतांना म्हटलं आहे. येणारी सराकार ही राज्याला सुरळीत चालवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. भाजपचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री वंसूधरा राजे यांनी पत्रकार परिषद बोलावली. या परिषदेत त्या बोलत होत्या. त्यांनी आपला राजीनामा राज्यपाल कल्याण सिंग यांना सोपवराला.

काय म्हणाल्या राजे

“मला मतदाराचा कौल मान्य आहे. मागील पाच वर्षात आमच्या पक्षानी लोकांसाठी अनेक कामे केली. येणारे सरकार आमच्या याच कार्याला पुढे घेऊन जाईल. आम्ही विधानसभेत लोकांचा आवाज पोहचवू.” – वसुंधरा राजे

- Advertisement -

मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी विजयी होतो आपली पत कायम राखली होती. मात्र सत्ता राखण्यात त्यांना पूर्णपणे अपयश आले. वसुंधरा राजे यांच्या विरोधात काँग्रेसचे जयवंत सिंह यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांना उमेदवारी दिली होती. मात्र मानवेंद्र सिंह हे राजे यांचा पराभव करण्यात अपयशी ठरले. राजस्थानमध्ये गेल्या २५ वर्षांपासून काँग्रेस – भाजपची आलटून पालटून सत्ता येत होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -