घरदेश-विदेशतामिळनाडूतील स्टरलाईट कॉपर प्रकल्पाला अखेर टाळं ठोकलं

तामिळनाडूतील स्टरलाईट कॉपर प्रकल्पाला अखेर टाळं ठोकलं

Subscribe

तामिळनाडू सरकारने सोमवारी तुतिकोरिन येथील वेदांत ग्रुपचा स्टरलाईट कॉपर प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले. या प्रकल्पाविरोधात गेल्या महिन्याभरापासून स्थानिक नागरिकांचे आंदोलन सुरु होते. या आंदोलनाला अखेर यश आले. हा प्रकल्प कायमस्वरुपी बंद करण्याचे आदेश तमिळनाडू सरकारने दिले.

सरकारने घेतला जनतेच्या हिताचा निर्णय

- Advertisement -

या प्रकल्पाविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात १३ आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला. या आंदोलनावेळी पोलिसांनी परिसरात जमावबंदीचे आदेश दिले होते. सलग एक महिना सुरु असलेल्या या आंदोलनानंतर सरकारने जनतेच्या हिताचा निर्णय घेत प्रकल्प बंद करण्याचे आदेश दिले. राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाला या प्रकल्पावर जप्तीची कारवाई करण्याचे आदेश तामिळनाडू सरकारने दिले.

प्रकल्पामुळे होत होते प्रदूषण

- Advertisement -

स्टरलाईट प्रकल्पामुळे मोठ्य़ा प्रमाणात प्रदूषण होत होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. तसंच या प्रकल्पाची क्षमता वाढवण्यासाठी विस्तार केला जाणार होता. त्याचे काम देखील सुरु झाले होते. या प्रकल्पाला विरोधात करण्यासाठीच स्थानिक नागरिकांनी आंदोलन सुरु केले होते. गेल्या महिन्याभरापासून सुरु असलेल्या या आंदोलनाला २२ मे रोजी हिंसक वळण लागले होते. यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये १३ आंदोलनकर्त्यांचा मृत्यू झाला.

जनतेच्या भावनांचा सन्मान

गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकल्प कायमस्वरुपी बंद व्हावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत होती. जनतेच्या भावनांचा सन्मान करत आम्ही हा प्रकल्प कायमस्वरुपी बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी दिलीय.

आंदोलनाचा परिणाम

तामिळनाडूच्या तुतिकोरिन या किनारपट्टीवरी जिल्ह्यात वेदांत स्टरलाइट कंपनीतर्फे उभारण्यात येत असलेल्या कॉपर प्लांटच्या बांधकामाला मद्रास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. याविरोधात झालेल्या आंदोलनात आंदोलकांच्या मृत्यूनंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं या संदर्भात तामिळनाडू सरकारकडून अहवाल मागवला होता. त्याचप्रमाणे या प्रकरणाची चौकशी माजी न्यायाधीशांमार्फत करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी सांगितले होते. मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना १० लाख आणि जखमींना ३ लाखांची मदत तामिळनाडू सरकारने जाहीर केली होती.

Priya Morehttps://www.mymahanagar.com/author/priya/
गेल्या ६ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहे. मला लिहायला, वाचायला आवडतेच पण त्यासोबतच मला नविन ठिकाणी फिरायला खूप आवडते. सध्या नविन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करत आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -