घरमनोरंजनयुग देवगणने लहान वयातच स्वीकारले फिटनेस चॅलेंज

युग देवगणने लहान वयातच स्वीकारले फिटनेस चॅलेंज

Subscribe

सोशल मीडियावर सध्या एकमेकांना फिटनेस चॅलेंज देण्याचा ट्रेंड सुरु आहे. प्रत्येक जण आपल्या जवळच्या व्यक्तीला टॅग करुन हे चॅलेंज देत आहे. यामध्ये क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेतेही मागे नाहीत. पण हे चॅलेंज एका लहान मुलाने स्वीकारून सगळ्यांनाच धक्का दिला आहे. आपणही आपल्या वडिलांपेक्षा कुठेही कमी नाही हे सिद्ध करत अजय देवगणचा मुलगा युग देवगणने हे चॅलेंज स्वीकारून पूर्ण केलं आहे.

क्रीडामंत्री राजवर्धन राठोडनं सुरु केला चॅलेंजचा हा ट्रेंड

- Advertisement -

क्रीडामंत्री राजवर्धन राठोड यांनी हा चॅलेंजचा ट्रेंड सुरु केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान देत विराट कोहलीने हा चॅलेंज ए का वेगळ्या पातळीवर नेला. अजय देवगण हा बॉलीवूडमध्ये आपल्या फिटनेसबद्दल प्रसिद्ध आहेच. पण त्याच्याही पुढे एक पाऊल जात युग देवगणने हे आव्हान स्वीकारून इतक्या कमी वयातच तोदेखील आई – वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत बॉलीवूडची वाट धरणार हे निश्चित केल्याचं यातून दिसत आहे.

तरूणाईला कळावं फिटनेसचं महत्त्व

- Advertisement -

तरूणाईला युग आव्हान देत असल्याचं ट्विट अजय देवगणने हा व्हिडिओ पोस्ट करत सांगितलं आहे. युगने अगदी सहजपणाने हे आव्हान पूर्ण केलं असून तरूणाईने त्याच्याकडून हे फिटनेस चॅलेंज स्वीकारून त्या वाटेवर चालावं असं अजयनं सुचवल्यासारखं वाटत आहे. याशिवाय त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हे आव्हान चालू करणारे राजवर्धन राठोड यांनादेखील यामध्ये टॅग केलंय.

आव्हान स्वीकारत आहेत सेलिब्रिटी

आतापर्यंत फिटनेस फ्रीक शिल्पा शेट्टी, अनुष्का शर्मा, सोनाक्षी सिन्हा यासारख्या खूप लोकांनी हे आव्हान पूर्ण केलं असून युग हा हे आव्हान पूर्ण करणारा सर्वात लहान मुलगा ठरला आहे. दरम्यान विराट कोहलीनं पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेलं आव्हान त्यांनी स्वीकारलं असून अजून पूर्ण केलेलं नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -