घरट्रेंडिंगविजय माल्ल्या म्हणतोय 'हे घ्या पैसे'...

विजय माल्ल्या म्हणतोय ‘हे घ्या पैसे’…

Subscribe

मी बँकांना १०० टक्के मुद्दल रकमेची परतफेड करु शकतो, पण बँकांनी व्याजाची रक्कम माफ करावी अशी मागमी विजय माल्ल्याने केली आहे.

देशाचे सुमारे ९ हजार कोटी बुडवून लंडनला फरार झालेला उद्योगपती विजय माल्ल्या पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विजय माल्ल्याने नुकतंच एक वादग्रस्त ट्वीट केलं असून, सध्या जगभरातत त्याचीच चर्चा आहे. ‘मी १०० टक्के कर्ज फेडण्यासाठी तयार आहे. मात्र, मी केवळ मुद्दलीची परतफेड करु शकतो, व्याजाची रक्कम  देऊ शकत नाही’, असं माल्ल्याने आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे. यावेळी भारतील नेते आणि प्रसारमाध्यमं पक्षपाती असल्याती टीकाही माल्ल्याने केली आहे. काही दिवसांपूर्वीच ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपीचं प्रत्यार्पण करण्याच आलं. याचाच पार्श्वभूमीवर विजय माल्ल्यने ट्वीटरच्या माध्यमातून बँकांच्या थकीत कर्जाविषयी भाष्य केले आहे. माल्ल्या आपल्या ट्वीटमध्ये म्हणतो की, किंगफिशीर ही मद्य क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी आहे, जी गेल्या ३ दशकांपासून भारतात यशस्वी व्यवसाय करत आहे. आजवर आमच्या कंपवीने अनेक राज्यांना हजारो कोटी रुपये मिळवून दिले आहेत. याशिवाय किंग फिशर एअरलाईन्समुळेही अनेक राज्यांचा मोठा फायदा झाला आहे. मात्र, आमच्या दुर्देवाने एअरलाईन्सचे नुकसान झाले. पण तरीही जर बँका व्याजाची रक्कम माफ करणार असतील, तर मी कर्जाच्या मुद्दलीची परतफेड करायला तयार आहे, जेणेकरुन बँकांचेही नुसकान होणार नाही.

- Advertisement -


एअरलाईन कंपनी डुबली म्हणून…

माल्ल्याने त्याच्या Tweet मध्ये म्हटलंय की, इंधन दरवाढीचा खूप मोठा फटका किंगफिशर एअरलाईनला बसला. यामुळेच कंपनीचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, बँकांकडून घेतलेल्या कर्जाची रक्कम हे नुकसान भरुन काढण्यात खर्च झाली. तरीही मी आता बँकांना १०० टक्के मुद्दल फेडायला तयार आहे. मात्र, बँकांनीही कृपया माझी व्याजाची रक्कम माफ करण्याची ऑफर स्वीकारावी.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -