घरदेश-विदेशएक डिसेंबरपासून वोडाफोन आयडियाचे नवे दर

एक डिसेंबरपासून वोडाफोन आयडियाचे नवे दर

Subscribe

१ डिसेंबरपासून कंपनीचे टेरिफ प्लान्स महाग होणार असल्याची माहिती व्होडाफोन-आयडिया लिमिटेडकडून (व्हीआयएल)ने दिली आहे. कंपनीला सातत्याने नुकसान होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

व्होडाफोन आयडियाच्या ग्राहकांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आहे. १ डिसेंबर पासून व्होडाफोन आणि आयडियाच्या ग्राहकांना जादा पैसे मोजावे लागणार आहेत. १ डिसेंबरपासून कंपनीचे टेरिफ प्लान्स महाग होणार असल्याची माहिती व्होडाफोन-आयडिया लिमिटेडकडून (व्हीआयएल)ने दिली आहे. कंपनीला सातत्याने नुकसान होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

व्होडाफोन-आयडियाची ओढाताण?

जगाच्या तुलनेत भारतात मोबाईल डेटासाठी सर्वात कमी शुल्क आकारण्यात येते. वाढलेल्या स्पर्धेमुळे ग्राहकांना कमीत कमी दरात डेटा उपलब्ध करुन दिला जात असल्याचे कंपन्यांकडून सांगण्यात येते. व्हीआयएलचा सरासरी ग्राहक महसूल १०५ रुपये प्रति महिना आहे. पण कंपनीचा तोटा वाढतच असल्याने व्होडाफोन-आयडीयाने शुल्क वाढीचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

व्होडाफोन आयडियाला ५१ हजार कोटींचा तोटा

दूरसंचार क्षेत्रात सध्या कंपन्या आर्थिक संकटाचा सामना करत आहेत. सर्वात जास्त ग्राहक असलेल्या व्हीआयएलने तिमाही तोट्याच्या बाबतीत टाटा मोटर्सलाही मागे टाकलं आहे. व्हीआयएलला सप्टेंबर २०१९ तिमाहीत ५० हजार ९२२ कोटी रुपये तोटा सहन करावा लागला. कारण, सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जी रक्कम द्यायची आहे, त्याचीही तरतूद करावी लागली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -