घरट्रेंडिंग... जेव्हा 'छोटे ट्रम्प' भर कार्यक्रमात झोपतात!

… जेव्हा ‘छोटे ट्रम्प’ भर कार्यक्रमात झोपतात!

Subscribe

जोशुआ ट्रम्प हा ११ वर्षीय विद्यार्थी सलग ८२ मिनीटं सुरु असलेल्या भाषणात कधी झोपला हे त्यालाही समजलं नाही.

समोर एखादा रटाळ कार्यक्रम किंवा भाषण चालू असेल तर अशावेळी डुलकी लागणं किंवा झोप येणं ही गोष्ट अगदी साहाजिक आहे. तुम्हीही कदाचित या गोष्टीचा कधीतरी अनुभव घेतला असेल. जिथे मोठ्या माणसांचीही अशी अवस्था होते तिथे बिचाऱ्या लहान मुलांची काय स्थिती होत असेल? हे आपण नक्कीच समजू शकतो. सध्या अशाच एका लहान मुलाचा फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतो आहे. हा प्रसंग आहे अमेरिकेत सुरु असलेल्या एका कार्यक्रमामधील. या कार्यक्रमात एक छोटासा मुलगा समोर भाषण सुरु असताना मस्तपैकी डुलक्या काढताना दिसतो आहे. हा फोटो व्हायरल होण्यामागचं मुख्य कारण म्हणजे पेंगणाऱ्या त्या मुलाचं ‘ट्रम्प’ हे आडनाव. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘स्टेट ऑफ द युनियन’ या कार्यक्रमासाठी जोशुआ ट्रम्प नावाच्या विद्यार्थ्याला विशेष अतिथी म्हणून बोलावले होते. मात्र, समोर डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण सुरु असताना जोशुआ चक्क डुलक्या घेत असल्याचं कॅमेरात कैद झालं. सोशल मीडियावर हा फोटो सॉलीड ट्रोल होत आहे.

छोट्या ट्रम्पला लागली झोप…

जोशुआ ट्रम्प हा ११ वर्षीय विद्यार्थी सलग ८२ मिनीटं सुरु असलेल्या भाषणात कधी झोपला हे त्यालाही समजलं नाही. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांच्या बाजूलाच विशेष अतिथी म्हणून जोशुआ बसला होता. मात्र, बहुधा जोशुआला झोप अनवार झाली होती. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे भाषण सुरू झाल्यावर काही वेळातच तो बसल्याजागी डुलक्या घेऊ लागला. याचाच फोटो कॅमेरात कैद करुन तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला. उपलब्ध माहितीनुसार, जोशुआला त्याचे शाळेतील मित्र नेहमीच त्याच्या ‘ट्रम्प’ आडनावावरुन चिडवतात. त्याचे मित्र त्याला ‘इडियट’ आणि ‘स्टुपिड’ म्हणत त्याचं रँगिगही करतात. यामुळे त्याच्या आईने मध्यंतरी शाळेतून त्याचं नवा काढलं होतं. दरम्यान, जोशूआ हा मेलेनिया यांनी आमंत्रित केलेल्या १३ विशेष अतिथींपैकी एक अतिथी होता.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -