घरताज्या घडामोडीबायकोच्या प्रियकराला संपवण्याचा रचला कट; कोरोना लसीच्या बहाण्याने पाजले विष!

बायकोच्या प्रियकराला संपवण्याचा रचला कट; कोरोना लसीच्या बहाण्याने पाजले विष!

Subscribe

देशात कोरोना विषाणूचा फैलाव झपाट्याने वाढत आहे. सोमवारपासून लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. मात्र या लॉकडाऊन दरम्यान अनेक गुन्हे घडत असल्याचे समोर येत आहे. दरम्यान काही महिलांनी कोरोनाच्या लसीच्या बहाण्याने चार जणांना विष दिल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये होमगार्ड विक्रम, त्याची आई, काका आणि एक नातेवाईक यांची हत्या करण्याचा या महिलांनी प्रयत्न केला. दिल्लीच्या अलीपूर भागात ही धक्कादायक घटना घडली आहे. विष पाजलेल्या चार जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर विष दिलेल्या महिलांनी घटनास्थळवरून पळ काढल्यानंतर सीसीटीव्हीच्या फुटजेच्या मदतीने पोलिसांनी समयपूर येथून या दोन आरोपींना अटक केली आहे.

नक्की काय घडले?

पोलिसाच्या माहितीनुसार, विक्रमच्या प्रेयसीच्या नवऱ्याच्या सांगण्यावरून या महिला रविवारी विक्रमच्या घरी गेल्या आणि त्याच्या कुटुंबाला आपण आरोग्य विभागाकडून आल्याचे सांगितले. तसेच कोरोनापासून वाचण्यासाठी दिल्लीच्या प्रत्येक घरात औषध पाजले जात असल्याचे सांगितले. त्यानंतर विक्रमसह त्याच्या आई, काका आणि एका नातेवाईकाला या महिलांनी विष पाजलं आणि महिला आरोपींनी तिथून पळ काढला.

- Advertisement -

पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या आरोपी महिलांना अटक केली. या आरोपी महिलांनी पोलिसांना चौकशीत सांगितले की, रमजानपूर येथे राहणाऱ्या प्रदीप यांच्या सांगण्यावर विक्रमच्या कुटुंबाला विष पाजल्याचे समोर आले. त्यानंतर प्रदीपला पोलिसांनी अटक केले. तेव्हा आरोपी प्रदीपने सांगितले की, माझ्या बायकोचे आणि विक्रमचे अनैतिक संबंध होते. दोघांना खूप समवजण्यात आले तरीही त्यांनी ऐकले नाही. यामुळे माझे विक्रमसोबत भांडण झाले. मग त्यानंतर प्रदीपने विक्रमच्या विरोधात कट रचला आणि या आरोपी महिलांना पैसे देऊन विक्रमच्या कुटुंबाला विष देऊ हत्या करण्यास सांगितले.


हेही वाचा – यामुळे टिकटॉकला बसला सर्वात मोठा फटका; रेटिंग स्टार ४.५ वरून १.३वर!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -