त्या महिलेचा ९ वर्षीय मुलावर वर्षभर सुरु होता बलात्कार

केरळमध्ये एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ वर्षाच्या मुलावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Mumbai
child abuse
पिडीत आणि अडचणीत सापडलेल्या मुलांना चाइल्ड लाइन देवदूतासारखी ठरते.

केरळमध्ये एका ३६ वर्षीय विकृत महिलेने अवघ्या ९ वर्षाच्या मुलावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या महिलेवर ९ वर्षाच्या मुलावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्या विकृत महिलेविरोधात गुन्हा नोंद केला असून केरळमधील थेहनीप्पलममध्ये ही घटना घडली आहे. पीडित मुलाने झाल्या प्रकाराची माहिती डॉक्टरांना दिल्याने महिलेचा विकृतपणा समोर आला. डॉक्टरांनी घटनेतील गांभीर्य ओळखून बाल हक्कासांठी लढणाऱ्या संबंधित संघटनांना माहिती दिली. त्यानंतर या प्रकणात पोलिसांकडे गुन्हा नोंद करण्यात आला. गेल्या वर्षभरापासून त्या विकृत महिलेकडून त्या पीडित मुलावर अत्याचार सुरू होते.

महिलेविरोधात गुन्हा दाखल

महिलेने केलेल्या लैंगिक छळामुळे त्या पीडित मुलाच्या मानसिकतेवर विपरित परिणाम झाला आहे. अशी माहिती बालहक्कांसाठी लढणाऱ्या संस्थेने दिली आहे. पोलिसांनी त्या महिलेविरोधात पॉस्को कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. आरोपी महिला पीडित मुलाची नातेवाईक आहे. ती त्याच्या घराजवळच रहाते. गेल्या आठवड्यात पीडित मुलगा त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना आपल्या त्रासाबाबत सांगत असताना ही धक्कादायक बाब उघडकीस आली. डॉक्टरांनी ही माहिती बालहक्कांसाठी लढणाऱ्या संस्थेला दिली. त्यांनी मुलाचा जबाब नोंदवून घेतला. त्यांनतर याची तक्रार पोलिसांकडे केली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here