घरदेश-विदेशयेडीयुरप्पांचा शपथविधी; शेतकऱ्यांची कर्जे माफ!

येडीयुरप्पांचा शपथविधी; शेतकऱ्यांची कर्जे माफ!

Subscribe
भाजपचे कर्नाटकातील विधीमंडळ नेते येडीयुरप्पा यांनी  गुरुवारी सकाळी  राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेताच येडीयुरप्पा यांनी राज्यातील शेतकऱ्यांची १ लाखांपर्यंतची कर्जे माफ केली. तर दुसऱ्या बाजूला राज भवनाबाहेर आंदोलन करून काँग्रेस-जनता दलाच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या या निर्णयाचा निषेध केला.
काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगत भाजपाने सत्तास्थापनेचा दावा केला होता. राज्यपालांनी त्यांना संधी देताच, येडीयुरप्पांनी गुरुवारी सकाळी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आता पुढील १५ दिवसांत त्यांना बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. मात्र मुख्यमंत्री होताच येडीयुरप्पा यांनी शेतकरी कर्जमाफीच्या विषयाबाबत सरकारची भूमिकाही मांडली. आपले सरकार शेतकऱ्यांचे १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करेन, असे त्यांनी जाहीर केले आहे. पुढच्या एक-दोन दिवसांत याबाबतची औपचारिक घोषणाही ते करणार आहेत.
काँग्रेस-जनता दल आघाडीने आपले आमदार फुटू नयेत म्हणून त्यांना एका रिसॉर्टवर कोंडून ठेवले आहे. असे असतानाही तेथून काँग्रेसचे ४ आमदार गायब झाल्याचे कळते. तर काँग्रेसचे १२ आणि जनता दलाचे ४ आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा भाजपने केला आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -