अविनाश कविश्वर यांनी सजावटीत साकारले शेतकऱ्यांचे जीवन

Thane

ठाण्याचे अविनाश कविश्वर यांनी देखील इको फ्रेंडली गणेशोत्सव सेलेब्रेट केले आहे. त्यांनी शाडूच्या मार्तीची मुर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. याशिवाय सजावटीमध्ये अन्न वाचवा असा संदेश देण्यात आला आहे. सजावटीसाठी लाल माती, कागद, पुठ्ठे इत्यादी वस्तूंचा वापर केला गेला आहे. सजावटीत त्यांनी शेतकऱ्याचे जीवनावर आधारीत विविध गोष्टी दाखवल्या आहेत. शेतकरी शेतात नागरणी, पेरणी करतो. त्यानंतर बी-बियाणांचे रुपांतर पिकात होते. या सर्व गोष्टींची प्रतिकृती सजावटीत साकारली गेली आहे.