Poster Out : ८३ चित्रपटात चिराग पाटील दिसणार वडिलांच्या भुमिकेत

Mumbai

वजनदार चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करणारा हॅण्डसम अभिनेता चिराग पाटील आता ८३ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ८३ चित्रपटात तो तुफान बॅटींग करताना दिसणार आहे. चिराग हा क्रिकेटर संदीप पाटील यांचा मुलगा आहे. विशेष म्हणजे ८३ या चित्रपटात तो संदीप पाटील यांची भुमिका साकारताना दिसणार आहे. नुकताच संदीपचा ८३ चित्रपटातील लूक व्हायरल झाला आहे. या पोस्टरमध्ये चिराग वडिलांच्या स्टाईलमध्ये बॅटींग करताना दिसत आहे.

२५ जून १९८३ ला लंडनमधील लॉर्डसच्या मैदानावर भारतीय संघाने किक्रेट विश्वचषक जिंकला होता. त्यामुळे केवळ देशातून नाही तर संपूर्ण जगातून भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक झाले. त्यामुळे ही तारीख भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात कोरली गेली. याच विजयावर ‘८३’ हा चित्रपट आधारीत आहे. हा चित्रपट येण्यासाठी तब्बल २ वर्षं वाट पहावी लागणार असून हा चित्रपट २०२० च्या १० एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा १९८३ च्या किक्रेट विश्वचषक विजयावर आधारीत ‘८३’ हा चित्रपट लवकरचं प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात अभिनेता रणवीर सिंह तत्कालीन कर्णधार कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे.

वजनदार, राडा रॉक्स, असेही एकदा व्हावे, या मराठी चित्रपटातून चिरागने आपल्य़ा अभिनयाची जादू दाखवली. त्याचबरोबर चिराग चार्जशीट, ले गया सद्दाम अशा हिंदी चित्रपटातही दिसला. चिरागचा स्वत:टा असा वेगळा चाहता वर्ग आहे. त्यामुळे चिरागला वडिलांच्या भुमिकेत पाहणं ताहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here