लवकरच रानू मंडलचं नवं गाणं ऐकायला मिळणार

लवकरच रानू मंडलचं नवं गाणं ऐकायला मिळणार

पश्चिम बंगालच्या रेल्वे स्टेशनवर गाणं गात आपलं पोट भरणारी रानू मंडल तिच्या एका गाण्याच्या व्हिडिओने रातोरात स्टार झाली. त्यानंतर तिला बॉलिवूडचा गायक हिमेश रेशमिया यांने आपल्या चित्रपटामध्ये गाण्याची संधी दिली. आता पुन्हा रानू मंडलला नवा प्रोजेक्ट मिळाला आहे. अभिनेत्री दीपिका चिखलियाचा चित्रपट ‘सरोजिनी’मध्ये रानू मंडलला गाण्याची संधी मिळाली आहे. सोशल मीडियावर अभिनेत्री दीपिका चिखलियाने याबाबत माहिती दिली आहे.

सरोजिनी हा एक बायोपिक आहे. या चित्रपटात दीपिका चिखलिया सरोजनी नायडू यांची भूमिका साकारणार आहे. दीपिका ट्विट करून असं लिहिलं आहे की, ‘माझा चित्रपट ‘सरोजिनी’. धीरज मिश्रा यांनी लिहिल्या या चित्रपटात रानू मंडल गाणं गाणार आहे.’ या ट्विटसोबत दीपिका चिखलियाने रानू मंडलचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.

व्हिडिओमध्ये रानू मंडल म्हणत आहे की, ‘मी रानू मंडल बोलत आहे. मी आता धीरज मिश्रासोबत ‘सरोजिनी’ चित्रपटातील सर्व गाणी गाणार आहे. मला आशा आहे की, मला तेच प्रेम आणि सन्मान मिळेल जे तुम्ही पहिल्यापासून देत आला आहात.’ त्यामुळे आता पुन्हा एकदा रानू मंडलची गाणी गायकाला मिळणार आहेत.

इंडिया डूडेशी बोलताना दीपिकाने चित्रपटाबद्दल सांगितले की, ‘मला सरोजिनी नायडू या बायोपिकची ऑफर मिळाली आहे, पण मी अजूनपर्यंत साईन केली नाही आहे. चित्रपटाचा कथेचे लेखन धीरज मिश्रा यांनी केलं असून दिग्दर्शन ही तेच करणार आहेत.’