अभिनेत्री क्रांती रेडकरने दिला जुळ्या मुलींना जन्म

अभिनेत्री क्रांती रेडकर हिने दुहेरी खुशखबर दिली असून तिच्या घरी दोन कन्यारत्नांचा जन्म झाला आहे. मुंबईच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये क्रांतीने ३ डिसेंबर रोजी जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.

Mumbai
kranti redkar
अभिनेत्री क्रांती रेडकर (सौजन्य-इंस्टाग्राम)

अभिनेत्री क्रांती रेडकर हिने दुहेरी खुशखबर दिली असून तिच्या घरी दोन कन्यारत्नांचा जन्म झाला आहे. मुंबईच्या सूर्या हॉस्पिटलमध्ये क्रांतीने ३ डिसेंबर रोजी जुळ्या मुलींना जन्म दिला आहे. या बातमीनंतर क्रांतीवर तिच्या मित्रमैत्रिण आणि चाहत्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. क्रांतीने मार्च २०१७ मध्ये आयपीएस अधिकारी समीर वानखेडेसोबत लग्न केले. इन्स्टाग्रामवर काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या डोहाळे जेवणाच्या फोटोमुळे क्रांतीकडे गुड न्यूज असल्याची चर्चा रंगली होती. मात्र अखेर तिच्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी मिळाली आहे.

 

View this post on Instagram

 

PC : @hisnameisaakash

A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar) on

लग्नानंतरही सिनेक्षेत्रातच राहणार 

२९ मार्च २०१७ ला क्रांती रेडकर विवाहबंधनात अडकली होती. त्यावेळी लोकमतसह खास बातचीतमध्ये तिने सांगितले होते की, “माझे पती हे देश सेवेत असल्याने त्यांच्यासाठी त्यांची ओळख ही गुलदस्त्यात ठेवणे हे गरजेचे असते आणि त्याचमुळे आम्ही दोघांनी अगदी साधेपणाने लग्न करायचे ठरवले. मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगणारी व्यक्ती आहे. त्यामुळे माझ्यातील वेडेपणा आयुष्यभर राहू देणारा नवरा मला मिळाला पाहिजे, असे माझ्या मैत्रिणींना नेहमीच वाटायचे आणि तो तसाच आहे. तो नेहमीच माझ्यातला मी पणा मला जपायला सांगत असतो. तो आणि मी स्वभावाने पूर्णपणे विभिन्न आहोत. तो तणावात असेल तर काहीच क्षणात मी तो तणाव दूर करण्यास सक्षम असते. आम्ही पती-पत्नी होण्याआधी एकमेकांचे खूप चांगले मित्र-मैत्रीण आहोत आणि आयुष्यभर राहाणार यात काही शंकाच नाही. मी लग्नानंतरही एक अभिनेत्री, दिग्दर्शिका म्हणून माझे करियर सुरूच ठेवणार असल्याचे तिने म्हटले होते.

वाचा : क्रांतीच्या स्वप्नांचा प्रवास

वाचा : मकरंद-क्रांतीचा ‘ट्रकभर स्वप्नां’चा प्रवास