घरमनोरंजन'शक्तिमान'ची पुन्हा होणार एण्ट्री; सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ

‘शक्तिमान’ची पुन्हा होणार एण्ट्री; सोशल मीडियावर मिम्सचा धुमाकूळ

Subscribe

शक्तिमानची प्रसिद्ध भूमिका करणारे आणि त्या काळात अनेकांना ‘Sorry शक्तिमान’ म्हणायला लावणारे मुकेश खन्ना यांनी देखील ट्विट करत यासंदर्भातील माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे

कोरोना व्हायरसचा परिणाम मनोरंजन विश्वावर देखील झाला आहे. यामुळे सगळ्याच चित्रपट आणि मालिकांचे शुटिंग थांबविण्याचा निर्माण घेण्यात आला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी म्हणून लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. कोरोनापासून वाचवण्यासाठी हाच पर्याय आहे. पंतप्रधान म्हणाले होते की, जर लॉकडाऊनचे पालन केले नाही, तर कोणत्या संकटाला सामोरे जावे लागेल, अशा परिस्थितीत सर्वच नोकरदारांना वर्क फ्रॉम होमच्या सूचना देण्यात आल्या आहे. या काळात लोकांनी मागणी केल्यामुळे ८० आणि ९० च्या दशकातील दूरदर्शनवरील प्रसिद्ध मालिका पुन्हा एकदा सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये गाजलेल्या रामायण, महाभारत, ब्योमकेश बक्शी आणि सर्कस या कार्यक्रमानंतर नागरिकांसाठी आणखी एक खूशखबर म्हणजे दूरदर्शनवरील सुपर हिरो शक्तिमान सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

- Advertisement -

मुकेश खन्ना यांची मुख्य भूमिका असणाऱ्या या मालिकेत त्यांनी साकालेला गंगाधर आणि त्यांनीच साकारलेला शक्तिमान प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार १ एप्रिलपासून दररोज दुपारी १ वाजता दूरदर्शनच्या डीडी नॅशनल या वाहिनीवर प्रसारित केला जाणार आहे.

पुन्हा बालपण अनुभवणं होणार शक्य 

शक्तिमानची प्रसिद्ध भूमिका करणारे आणि त्या काळात अनेकांना ‘Sorry शक्तिमान’ म्हणायला लावणारे मुकेश खन्ना यांनी देखील ट्विट करत यासंदर्भातील माहिती आपल्या चाहत्यांना दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा, ‘अदभुत अदम्य साहस की परिभाषा है,
ये मिटती मानवता की आशा है,
ये श्रृष्टि की शक्ति का वरदान है,
ये अवतार नहीं है ये इंसान है,
शक्तिमान.. शक्तिमान..शक्तिमान..’, असा आवाज घराघरातून ऐकायला मिळणार असून आपल्या बालपणाला पुन्हा उजाळा मिळणार हे नक्की…

- Advertisement -

सोशल मीडियावर मीम्सचा धुमाकूळ 

शक्तिमान मालिकेचे मीम्स आधीच सोशल मीडियावर खूप व्हायरल होत असून नेटकऱ्यांसाठी शक्तिमान हे प्रसिद्ध पात्र आहे. अशावेळी जर शक्तिमानचा सिक्वेल येणार असेल, हे समजल्यावस सोशल मीडियावर मीम्सचा अक्षरश: धुमाकूळ बघायला मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -