दीपिकाला लग्नाआधी AKने दिलेला ‘हा’ सल्ला

ज्यावेळी दीपिका रणवीरला भेटण्यासाठी सेटवर गेली होती त्यावेळी अनिल कपूर यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे ती खूपच भावूक झाली.

Mumbai
Anil Kapoor told Deepika Padukone to never leave Ranveer Singh
फाईल फोटो
‘दीपवीर’ अर्थात दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांचं तिसरं आणि शेवटचं वेडिंग रिसेप्शन नुकतंच मुंबईत पार पडलं.  सिनेजगत, क्रीडाविश्व आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी या ग्रँड रिसेप्शनला हजेरी लावली होती. मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये संपन्न झालेल्या या रिसेप्शन सोहळ्याला, बॉलीवूडच्या अनेक स्टार्सनी चार चांद लावले. यावेळेचा दीपवीरचा लूकही तितकाच भाव खाऊन गेला. गुलाबी गाऊनमधील दीपिका आणि ब्लॅक सूटमधला रणवीर सर्वांचंच लक्ष वेधून घेत होते. एव्हरग्रीन हिरो अनिल कपूर यांनीही या रिसेप्शन सोहळ्याला हजेरी लावली होती. त्यांचे काही ‘झकास’ फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले. याचनिमित्ताने दीपिका पदुकोण आणि अनिल कपूर यांच्या काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या. नुकतेच अनिल कपूर नेहा धुपियाच्या एका चॅट शोमध्ये सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी दीपिका आणि त्यांच्यामधील एक हळवा किस्सा शेअर केला. शोदरम्यान अनिल कपूर म्हणाले, की ‘दीपिका रणवीरला भेटण्यासाठी बरेचजा ‘दिल धडकने दो’ या चित्रपटाच्या सेटवर यायची. दीपिका आणि रणवीरच्या लग्नापूर्वी ती अशीच एकदा सेटवर आले होती. त्यावेळी मी तिला एक सल्ला दिला होता ज्यामुळे ती खूपत भावूक झाली होती’

‘त्या’ सल्ल्याने भावूक झाली दीपिका

ही आठवण सांगतेवेळी AK म्हणाले, ज्यावेळी दीपिका सेटवर आली होती त्यावेळी ‘तू रणवीरला कधीही सोडू नकोस’ असा सल्ला मी तिला दिला होता. ‘रणवीरपेक्षा चांगला मुलगा तुला कधीच मिळणार नाही, तो तुला खूप जमेल त्यामुळे तूही त्याला जप आणि त्याची कायम साथ दे’, असा सल्ला मी तिला दिला होता. हा सल्ला ऐकून दीपिका त्यावेळी खूपच भावूक झाली होती. आज दीपिका आणि रणवीरला एकत्र पाहून मला खूप आनंद होत असल्याचंही अनिल कपूर यावेळी म्हणाले. तसंच शोदरम्यान त्यांनी दीपिका आणि रणवीरला पुढील वैवाहिक आणि व्यावसायिक आयुष्यासाठी शुभेच्छादेखील दिल्या.

दीप-वीरच्या रिसेप्शनला AK चा झकास लूक…


पाहा : प्रियांका चोप्राच्या रिसेप्शनचे खास फोटो 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here