घरमनोरंजनअॅवेंजर एन्ड गेमने घडवला इतिहास

अॅवेंजर एन्ड गेमने घडवला इतिहास

Subscribe

मार्व्हलचा अॅवेंजर एन्ड गेमचा ट्रेलरने २४ तासात तब्बल २८९ मिलीयन्स इतके व्ह्यूज मिळवून इतिहास घडवला आहे.

मार्व्हलचा अॅवेंजर एन्ड गेमचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. डॅनियल आर. पीके. या हॉलिवूड लेखकाने ७ डिसेंबर रोजी या चित्रपटाचा चौथ्या भागाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचे ट्विट केले होते. त्याप्रमाणे ७ डिसेंबर रोजी अॅवेंजर एन्ड गेमचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला. मार्व्हलचा अॅवेंजर एन्ड गेमला सर्वाधिक व्ह्यूज मिळाल्याचे समोर आले आहे. इतिहासात पहिल्यांदाच या चित्रपटाच्या ट्रेलरला सर्वात जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. या चित्रपटाला २४ तासात तब्बल २८९ मिलीयन्स इतके व्ह्यूज मिळाले आहेत. हा चित्रपट येत्या २६ एप्रिल २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

- Advertisement -

असा आहे अॅवेंजर एन्ड गेमचा चौथा भाग

या भागाची सुरुवात थानोसनी अर्ध जग नष्ट केल्यापासून होते कॅप्टन अमेरिका, ब्लॅक विडो आणि हल्क यावर चर्चा करताना दिसतात. तर आयर्न मॅन त्याच्या मास्कवर शेवटचा व्हिडीओ मेसेज करताना दाखवला आहे आणि यात अॅन्ट मॅन दिसणार आहे. थानोसनी अर्ध जग नष्ट केले असून त्याचा सामना अॅवेंजरची टीम कशी करते आणि त्यांना यात कोण मदत करत ही अॅवेंजरच्या प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे. यासोबत थॉर सुद्धा त्याची सगळी शक्तीपणाला लावून थानोसला हरवण्यात यशस्वी होईल का हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.

आधीचा अॅवेंजर

आधीच्या अॅवेंजरच्या इनफिनिटी वॉरमध्ये थानोस हा खलनायक जिंकतो. तसेच थानोसविरोधातल्या युद्धात लोकी, हीमडॉल, स्कारलोट, व्हिजन, ब्लॅक पँथर, स्पायडर मॅन, डॉक्टर स्ट्रेंज, विंटर सोल्जर, स्कारलेट विच, द गार्डियन ऑफ द गॅलक्सी, निक फुरी हे सुपर हीरो मरण पावतात. त्यामुळे मार्व्हलच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र आता येणाऱ्या नव्या भागाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -