Thursday, January 14, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी 'मणिकर्णिका रिटर्न्स'ची घोषणा करताच, युझरने मागितले पहिल्या पार्टचे पैसे

‘मणिकर्णिका रिटर्न्स’ची घोषणा करताच, युझरने मागितले पहिल्या पार्टचे पैसे

कंगनाने आज 'मणिकर्णिका रिटर्न्स' या चित्रपटाची घोषणा केली असून ती या चित्रपटात कश्मीरच्या राणीची भूमिका साकारणार आहे.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगना रनौतचा (Kangana Ranaut) चित्रपट ‘मणिकर्णिका’ने (Manikarnika) पडद्यावर धुमाकूळ घातला होता. या चित्रपटात कंगना रनौतने राणी लक्ष्मीबाई यांची व्यक्तिरेखा साकारली होती. यामुळे कंगनाने साकारलेल्या या व्यक्तिरेखेमुळे सगळेच हैराण झाले होते. आता पुन्हा एकदा ‘मणिकर्णिका’प्रमाणे कंगना रनौत पडद्यावर धमाका करण्यासाठी तयार आहे. दरम्यान अलीकडेच कंगना रनौतने ‘मणिकर्णिका रिटर्न्स’ची (Manikarnika Return: The Legend Of Didda) घोषणा केली आहे. या चित्रपटात कंगना कश्मीरची राणी दिद्दाची व्यतिरेखेत दिसणार आहे. याबाबत कंगनाने ट्विट केले आहे, तिचे हे ट्विट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहे. तसेच तिच्या ट्विटवर कमेंटचा जोरदार पाऊस पडत आहे.

- Advertisement -

कंगनाने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘झाशीच्या राणी सारख्या अनेक साहसी कहाण्यांचा भारत साक्षीदार आहे. अशीच एक अनटोल्ड वीरगाथा कश्मीरच्या राणीची आहे. ज्यामध्ये महमूद गजनवीला यांना त्यांनी एकदा नाहीतर दोनदा हरवले होते. कमल जैन आणि मी हीच कहाणी घेऊ येत आहोत. मणिकर्णिका रिटर्न्स: द लेजेंट आणि दिद्दा.’ कंगनाच्या या ट्विटवर डेड हा ट्विट युझर म्हणाला की, ‘चुडेल पहिल्यांदा पहिल्या पार्टचा रिफंड कर.’ अशाच प्रकारचे कंगनाची खिल्ली उडवणारे काही जणांनी ट्विट केले असून अनेकांनी तिला या चित्रपटासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

- Advertisement -

दरम्यान कश्मीरवर राज्य करणारी दिद्दा पहिली महिला शासक होती. १० व्या शतकापासून ते ११व्या शतकापर्यंत त्यांनी सुमारे ५ दशकांपर्यंत कश्मीरवर राज्य केले आहे. यापूर्वी कंगना ‘मणिकर्णिका’चित्रपटात कमल जैनसोबत काम केले आहे. वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, लवकरच कंगना ‘थलाइवी’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कंगना रनौत तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांची व्यतिरेखा साकारणार आहे. याशिवाय कंगना आगामी चित्रपट ‘धाकड’ची तयारी करत आहे.


हेही वाचा – खुशखबर! आता NETFLIX वर दर आठवड्याला पहा नवीन सिनेमे


 

- Advertisement -