घरमनोरंजनसंगीतकार शेखर रवजियानीला ३ अंडे पडले महागात; आकडा बघून व्हाल थक्क

संगीतकार शेखर रवजियानीला ३ अंडे पडले महागात; आकडा बघून व्हाल थक्क

Subscribe

फक्त उकडलेल्या तीन अंड्यांकरिता खूप जास्त पैसे आकारल्याने हे बिल सोशल मीडियावर होतेय व्हायरल

बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार शेखर रवजियानी त्याच्या सुपरहिट गाण्यासाठी ओळखले जातात. शेखर आणि विशाल डडलानी यांची जोडी बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध आहे. संगीतकार शेखर रवजियानी यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे. ते ट्विट केल्यानंतर शेखर खूपच चर्चेत आहे. हे ट्विट करताना त्याने एक हॉटेलचे बिल शेअर केले आहे. त्याने असे सांगितले की, फक्त उकडलेल्या तीन अंड्यांकरिता खूप जास्त पैसे आकारल्याने हे बिल शेअर केले आहे.

- Advertisement -

हे बिल ट्विटरवरून शेअर करताना असे लिहिले की, ३ उकडलेल्या अंड्यांकरिता १ हजार ६७२ रुपये? हे अंडे खूपच महाग पडले. या फक्त तीन अंड्यांकरता हॉटेलने किती पैसे त्याच्याकडून घेतले, हे त्याने चाहत्यांसह शेअर केले आहे. शेखरने केलेल्या या ट्विटवर नेटिझन्सच्या असंख्य प्रतिक्रिया येत आहेत. त्याचे हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. यापुर्वी देखील बॉलिवूड अभिनेता राहूल बोसला केळ्यांसाठी खूप जास्त पैसे मोजावे लागले होते. त्यावेळी हा अभिनेता देखील चर्चेत आला होता.

- Advertisement -

शेखर रवजियानी हा भारतीय संगीत दिग्दर्शक असून त्याने काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला होता. शेखर रवजियानी आणि विशाल डडलानी यांच्या जोडीने अनेक चित्रपटांसाठी यशस्वी संगीत दिग्दर्शन केले आहे.


#पुन्हानिवडणूक ट्विटवरून उफाळला वाद; म्हणे हा तर प्रमोशन फंडा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -