घरमनोरंजनदेशभक्तीवर आधारित चित्रपटांची बॉलिवूडमध्ये चलती

देशभक्तीवर आधारित चित्रपटांची बॉलिवूडमध्ये चलती

Subscribe

अनेक शूर सैनिकांच्या, नेत्यांच्या आयुष्यावरील चरित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा ऐतिहासिक चित्रपट येण्यास सुरूवात

सध्या बॉलिवूड विश्वात नव-नवीन संकल्पनेवर आधारित चित्रपट तयार होत असलेले अधिक बघायला मिळते. गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडमध्ये चरित्रपटांची चलती आहे. अनेक शूर सैनिकांच्या, नेत्यांच्या आयुष्यावरील चरित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा ऐतिहासिक चित्रपट येण्यास सुरूवात झाली आहे.

या चित्रपटांमध्ये देशावर असलेले प्रेम आणि देशभक्तीवर आधारलेले चित्रपटांची चलती असून अशा चित्रपटांचा ट्रेंड सध्या दिसतोय. सध्या आगामी चित्रपटातील मुख्यत्वे बायोपिकमध्ये चित्रपट इंडस्ट्रीमधील आघाडीचे आणि भलेमोठे कलाकार या देशभक्तीवर आधारित कलाकार प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

- Advertisement -

विवेक ऑबेरॉय

बॉलिवूड अभिनेता ओबेरॉय विंग कमांडर अभिनंदन यांच्यावर आधारित असणाऱ्या बायोपिकमध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या चित्रपटाची कथा बालाकोट आणि भारतीय वायुसेनेने केलेल्या पराक्रमावर आधारलेला आहे. हा चित्रपट २०२० मध्ये सर्वत्र प्रदर्शित होणार असून याचे शुटिंग जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि आग्रा या ठिकाणी होणार आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा

परमवीर चक्र विजेता कॅप्टन विक्रम बत्रा याच्या आयुष्यावर आधारित बायोपिकच्या चित्रीकरणाला आज सुरुवात झाली आहे. या चित्रपटाचे नाव ‘शेरशहा’ ठेवण्यात आले असून सिद्धार्थ मल्होत्रा या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. विक्रम बत्राच्या आयुष्यावर आधारलेल्या चित्रपटामध्ये सिद्धार्थ दिसणार आहे.

- Advertisement -

जान्हवी कपूर

इंडियन एअरफोर्स पायलट गुंजन शर्माच्या जीवनावर आधारित अभिनेत्री जान्हवी कपूर ही तिच्या आगामी चित्रपटामध्ये प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. गुंजन शर्माने कारगील युद्धाच्या दरम्यान हे एअरफोर्सचे विमान उडवले होते. हा चित्रपट १३ मार्च २०२० रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन शऱण शर्मा यांनी केले आहे.

विकी कौशल

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल लवकरच मेघना गुलजार यांच्या सॅम या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये विकी फिल्ड मार्शल सॅम मानेक्शॉची भूमिका साकारणार आहे. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाचा पहिला लूक देखील शेअर केला होता.

वरूण धवन

परमवीर चक्र मिळालेल्या अरूण खेत्रपाल यांचा १४ ऑक्टोबरला जन्मदिवस असतो. यांच्या जीवनावर आधारित असणाऱ्या बायोपिकमध्ये अभिनेता वरूण धवन त्यांची भूमिका साकरताना दिसणार आहे. भारत-पाक युद्धात वयाच्या २१ व्या वर्षी अरूण खेत्रपाल शहीद झाले होते. हा चित्रपट श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणार आहे.

अजय देवगण

अभिनेता अजय देवगण हा त्याच्या आगामी ‘भुजः द प्राइड ऑफ इंडिया’या चित्रपटामध्ये दिसणार आहे. या चित्रपटामध्ये स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांच्या भूमिकेत दिसणार आहे. विजय कर्णिक हे १९७१ च्या भारत-पाकच्या युद्धादरम्यान भुज एअरपोर्टचे इनचार्ज आहे. या चित्रपटामध्ये अजयसोबत परिणीती चोप्रा, संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -