घरमनोरंजनदीप-वीर ने घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन!

दीप-वीर ने घेतले तिरुपती बालाजीचे दर्शन!

Subscribe

बॉलीवूडचे प्रसिद्ध दाम्पत्य दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह आज आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करत आहेत. डेस्टिनेशन वेडिंग केलेल्या दीप-वीरने लग्नाचा वाढदिवस देवदर्शन करुन साजरा करण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात दीपिका आणि रणवीर हे विवाह बंधनात अडकले. कोणत्याही पद्धतीचे पार्टीचे आयोजन न करता देवदर्शन करत लग्नाचा वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय दीपिका-रणवीरने घेतला. त्यानुसार आज सकाळी या दाम्पत्याने तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली. तिरुपती बालाजीचे दर्शन घेतल्यानंतर दीप-वीर सुवर्ण मंदिराचे दर्शन घेणार आहेत.

- Advertisement -

कोणत्याही मोठ्या पार्टीचे आयोजन किंवा बाहेर कुठेही फिरायला न जाता दीप-वीरने देवदर्शन करत लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज त्यांनी तिरुपती बालाजी मंदिराला भेट दिली. यावेळी त्यांनी व्यंकटेश्वराची पूजा करुन सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रार्थना केल्याची माहिती दीपिकाने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे.

- Advertisement -

दीप-वीरचा पेहराव

दीप-वीरने तिरुपती बालाजीला दिलेल्या भेटीचे काही फोटो आणि व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानुसार दीप-वीरने पारंपरिक पेहराव करत देवाचे दर्शन केले आहे. रणवीर सिंगने ऑफ व्हाइट रंगाची शेरवानी घातली असून दीपिकाने गुलाबी रंगाची जरीदार साडी नेसली आहे. त्याचप्रमाणे दीपिकाने भांगेत सिंदूर भरले असून मोठे-मोठे झुमके आणि दागिने घातले आहेत. दरम्यान मागील वर्षी १४ नोव्हेंबर रोजी दीप-वीरने इटलीतील लेक कोमो येथे डेस्टिनेशन वेडिंग केले होते. सिंधी आणि दक्षिण भारतीय अशा दोन्ही पद्धतीत हे लग्न पार पडले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -