घरमनोरंजनमराठी चित्रपटसृष्टीतील पहिला मराठी हॉलीवूड चित्रपट

मराठी चित्रपटसृष्टीतील पहिला मराठी हॉलीवूड चित्रपट

Subscribe

साईबाबा स्टुडिओज आणि समृद्धी सिनेवर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने 'सुख म्हणजे नक्की काय असतं' पहिला मराठी हॉलीवूड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत एका पाठोपाठ एक नवनवीन विषय हताळत आहेत. तसेच चित्रपटांचा चढता आलेख हा यशाच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत. नाजूक विषय उत्तम सादरीकरणातून निर्माते-दिग्दर्शक मांडताना दिसत आहेत. मराठी चित्रपटांमध्ये येणारे विषय, त्यांचा आशय, तांत्रिक गोष्टी हे पाहून अनेक जण चित्रपट निर्मितीकडे कल जात आहे. त्यामध्ये आता साईबाबा स्टुडिओज आणि समृद्धी सिनेवर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हा पहिला मराठी हॉलीवूड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण हे अमेरिकेतील लॉस एंजलिस येथे होणार आहे.

पहिल्यांदाच मराठी चित्रपट निर्मितीकडे पाऊल

साईबाबा स्टुडिओज ही कलात्मक कार्यक्रम देणारी निर्मितीसंस्था पहिल्यांदाच मराठी चित्रपट निर्मितीकडे पाऊल टाकणार आहे. तसेच दिग्दर्शिका समृद्धी पोरे या ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शनाचे काम सांभाळणार आहेत. दिग्दर्शिका समृद्धी पोरे यांनी याआधी ‘मला आई व्हायचंय’, ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ आणि हिंदीमध्ये ‘हेमलकसा’ असे संवेदनशील चित्रपट मोठ्या पडद्यावर आणले आहेत. ‘साईबाबा स्टुडिओज’चे शिवकुमार यांनी अनेक सरस हिंदी कार्यक्रमांची निर्मिती केली आहे. मराठीतही काहीतरी करण्यासाठी ते उत्सुक होते त्यामधूनच ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आणणार आहेत.

- Advertisement -

चित्रपटाचा विषय, कलाकारांची नावं गुलदस्त्यात

एक चांगली निर्मिती – संस्था या नात्याने प्रेक्षकांना आम्ही काय देत आहोत हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीविषयी माझ्या मनात आदर असून या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीसाठी आपलंही योगदान देता येत असल्याचं समाधान असे ‘साईबाबा स्टुडिओज’ कंपनीचे शिवकुमार यांनी मत व्यक्त कले आहे. तसेच चाकोरी बाहेर जाऊन प्रेक्षकांना काहीतरी नवीन देण्यासाठीचा या चित्रपटाची निर्मिती करायची आहे, असे चित्रपटाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले. या चित्रपटाचा विषय आणि त्यातिल कलाकार यांची नाव गुलदस्त्यात असल्यामुळे ते जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना काही वेळ थांबावे लागणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -