घरताज्या घडामोडीअभिनयच्या फेक फेसबुकवरुन मुलीच्या फोटोची मागणी

अभिनयच्या फेक फेसबुकवरुन मुलीच्या फोटोची मागणी

Subscribe

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याच्या नावाने फेक फेसबुक अकाऊंट काढून एका मुलीची फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेता संग्राम समेळ हा एका फॅन्सच्या मेसेजला वैतागल्याची घटना ताजी असताना पुन्हा एकदा एका अभिनेत्याच्या फेक अकाऊंटवरुन मुलीच्या बोल्ड फोटोची मागणी केल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे याच्या नावाने फेक फेसबुक अकाऊंट काढून एका मुलीची फसवणूक करण्यात आली आहे. ‘एका चित्रपटासाठी तुझा बोल्ड फोटो पाठवून दे’, असा मेसेज करत संबंधित तरुणीला फसवण्यात आले आहे. याबद्दलची माहिती देत प्रिया बेर्डे यांनी फेसबुक अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. फेक फेसबुक अकाऊंटविरोधात कारवाई करणार असल्याचे त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

प्रिया बेर्डेची फेसबुक पोस्ट

अभिनय बेर्डे याच्या नावाने करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘सावधान …..हा प्रोफाइल अभिनयचा नाही, या प्रोफाइलवरून एका मुलीला कॉन्टॅक्ट केलं गेलं आणि सांगितलं की नागराज मंजुळे बरोबर एक फिल्म करतोय आणि त्यात बोल्ड सिन आहेत आणि तुझा एक बोल्ड फोटो पाठवून दे तर त्या मुलीने आम्हाला कॉन्टॅक्ट करून वरील माहिती दिली. तेव्हा प्लिज कुणीही याची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका, आम्ही ऍक्शन घेत आहोत..या आधीही मी याबाबत पोस्ट टाकली होती हे ही नमूद करतेय’. दरम्यान, या फेक फेसबुक अकाऊंटविरोधात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.


हेही वाचा – चाहतीच्या सततच्या मेसेजला कंटाळून अभिनेत्याने घेतला ‘हा’ निर्णय


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -