Monday, January 11, 2021
27 C
Mumbai
घर मनोरंजन माझ्यावर हसणाऱ्यांवर आता रडण्याची वेळ, कंगना रनौतचे नवे ट्वीट

माझ्यावर हसणाऱ्यांवर आता रडण्याची वेळ, कंगना रनौतचे नवे ट्वीट

कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेचा विषय ठरते.

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त ट्वीटमुळे चर्चेचा विषय ठरते. महापालिका, मुंबई पोलिस, ते अनेक राजकीय नेत्यांविरोधात आपली भूमिका मांडताना विचार करत नाही. बऱ्याचदा तिला सोशल मिडियाच्या माध्यमातून ट्रोल केले जाते. नुकतेच तिने एक नवे ट्वीट शेअर केले आहे ज्यात ती सांगते, जेव्हा मी इंडस्ट्रीमध्ये आले होते तेव्हा अनेकांनी माझी चेष्टा केले होती. पण आता माझे यश पाहून त्या लोकांवर रडण्याची वेळ आली आहे.कंगनाने या ट्वीटमध्ये स्पष्ट म्हटले आहे की, मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आले तेव्हा प्रत्येकजण माझ्यावर हसले. माझ्या बोलण्याची पद्धत, माझे केस, माझे कपडे आणि माझ्या इंग्रजी बोलण्याची साऱ्यांनी थट्टा उडवली, मात्र त्या लोकांवर रडण्याची वेळ आली आहे. आणि मी हसत आहे हा, हा, हा…

- Advertisement -

कंगनाने तिच्या ट्विटर अकाउंटवर सध्या ३० लाख फॉलोवर्सचा टप्पा पार केला आहे. कंगनाच्या नवनव्या ट्विटमुळे तिला ट्विटर बऱ्याचदा ट्रोल केले जाते. ३० लोक फॉलो करत असल्याचे स्वत : कंगनाने सांगितले आहे आणि यूजर्सचे आभार मानले आहेत. कंगनाने याबद्दलची पोस्ट शेअर केली आहे आणि लिहिले आहे की, मी ऑगस्टमध्ये ट्विटरवर आले होते. काही दिवसांपूर्वी मला फॉलो करणारे फक्त हजारांमध्ये होते मात्र, आता ते 30 लाख झाले आहेत. मी ट्विटरवर बराच वेळ घालवला आहे आणि तो मजेदार आहे, सर्वांचे आभार…

 


- Advertisement -

हेही वाचा – राज्य मंत्रिमंडळातल्या ज्येष्ठ मंत्र्याचा पासपोर्ट जप्त! षडयंत्राचा दावा!


 

- Advertisement -