घरमनोरंजनबिग बॉसनंतर माधव देवचके सुभाष घईंच्या 'या' चित्रपटात

बिग बॉसनंतर माधव देवचके सुभाष घईंच्या ‘या’ चित्रपटात

Subscribe

‘बिग बॉस सिझन २’ हा कार्यक्रम सध्या अंतिम टप्प्यात येऊन पोहचला आहे. रविवारच्या विकेंडमध्ये हिना पांचाळ ही सदस्य बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे. सध्या बिग बॉस मराठीचे दुसरे पर्व खूपच लोकप्रिय झाले आहे. बिग बॉसच्या घरातील अनेक सदस्य हे प्रकाशझोतात आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे अभिनेता माधव देवचके. काही दिवसांपूर्वी माधव देवचके बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आहे. आता छोट्या पडद्यावरुन मोठ्या पडद्यावर माधव देवचके पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. लवकरच सुभाष घई यांच्या चित्रपटामध्ये माधवला काम करण्याची संधी मिळणार आहे.

- Advertisement -

माधव ‘विजेता’ या चित्रपटामध्ये झळकणार आहे. सुभाष घई यांच्या मुक्ता ऑट्रर्स या निर्मिती संस्थेअंतर्गत विजेता हा चित्रपट तयार होत आहे. तसेच या चित्रपटच्या दिग्दर्शनाचा भार अमोल शेडगे यांनी सांभाळला आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटातून दिसणार आहे.

- Advertisement -

माधव ‘विजेता’ या चित्रपटात मुख्य भूमिकेतून दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीतकरणाला सुरुवात झाली आहे. ‘सुभाष घईंच्या मोठ्या फिल्ममेकरचा सिनेमा बिग बॉस केल्यानंतर लगेचच मिळाला, हे माझे भाग्यच म्हणायला हवे. दिग्गज फिल्ममेकर सुभाष घईं यांच्या चित्रपटात काम करायला मिळणं ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. मी त्यांचे सुपर हिट चित्रपट बघून लहानाचा मोठा झालो. त्यांच्या मुक्ता आट्रर्सच्या बॅनरच्या चित्रपटात आता काम करायला मिळणं, हे जणू स्वप्नच आहे,’ असं माधव देवचके म्हणाला.

माधव ह्याचं क्रेडिट बिग बॉसच्या शोला देताना म्हणतो, ‘बिग बॉसचे फिल्मसिटीमध्ये सध्या जिथे घर बांधण्यात आलें आहे. ती जागाच खरं तर माझ्यासाठी खूप लकी आहे. ह्याअगोदर ह्याच जागी हमारी देवरानी आणि सरस्वती ह्या माझ्या दोन सुपरहिट मालिकांचे सेट लागले होते. हमारी देवरानी, सरस्वती आणि बिग बॉस माझ्या करीयरमधले तीन टर्निंग पॉईंट ठरले.’

या अगोदर माधवने ‘जर्नी प्रेमाची’ आणि ‘एफयू: फ्रेंडशिप अनलिमिटेड’ या चित्रपटातून दिसला होता. आता हा माधवचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला कधी येईल हे लवकरच कळेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -