घरमनोरंजनVideo: उत्कंठा वाढविणारा ‘विक्की वेलिंगकर’चा ट्रेलर आऊट

Video: उत्कंठा वाढविणारा ‘विक्की वेलिंगकर’चा ट्रेलर आऊट

Subscribe

‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार

सौरभ वर्मा यांचे दिग्दर्शित आणि मुख्य भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित आहे. सोनाली या चित्रपटात नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार असून या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती, अशातच नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीजरने प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेल्याचे दिसत आहे.

उत्कंठा वाढविणारा ट्रेलर

या ट्रेलरमध्ये सोनाली कुलकर्णी ही ‘विक्की वेलिंगकर’च्या भूमिकेत दिसत असून ट्रेलरच्या सुरूवातीला ती एक कॉमिक बूक आर्टिस्ट आहे. तिचे बूक आणि घड्याळाचे दुकान असून ती कोणापासून तरी पळताना दिसत आहे. पण ती कोणापासून, कशासाठी आणि किती वेळ पळणार आहे याचे उत्तर तिच्याकडे नसून ती हे वेळेचं कोडे सोडविण्याचा प्रयत्न करते आहे. पुढे या ट्रेलरमध्ये ‘मास्क मॅन’ देखील दिसत असून ती त्याच्यापासून पळते आहे असे लक्षात येते. हे वेळेचे कोडे उलघडण्यासाठी तिला तिचा हॅकर मित्र, विद्या आणि पबजी आजी मदत करताना दिसत आहे. हा ट्रेलर बघितल्यानंतर “ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?, मास्क मॅन नक्की कोण आहे? हा वेळेचा नक्की काय खेळ आहे, चित्रपटामध्ये वेळेचा, विक्की, विद्या, आणि मास्क मॅनचा नक्की काय संबंध आहे, असे अनेक उत्कंठादायक प्रश्न निर्माण झाल्याने चित्रपटाची उत्कंठा अधिक वाढली आहे.

- Advertisement -

अशी आहे कथा

विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून ती एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. या चित्रपटामध्ये सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, यांच्याबरोबर संग्राम समेळ, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, आणि रमा जोशी यांच्यादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अर्जुन सिंग बरन व कार्तिक डी निशाणदार यांच्या ‘जीसिम्स’ची निर्मिती असलेला प्रणय चोकसी व ‘डान्सिंग शिवा’ प्रस्तुत मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’ ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.


‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटाचे चित्रिकरण चक्क २० दिवसांत उरकलं!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -