Video: रितेश देशमुखच्या ‘माऊली’चा टिझर

'आपलं नाव ऐकलं नाय, असं एक बी गाव नाय अन् हाणल्या बगैर सोडलं तर माऊली आपलं नाव नाही,' असा डायलॉग मारत रितेश देशमुख अर्थात 'माऊली'ची भन्नाट एंट्री होते.

Mumbai
सौजन्य-युट्यूब

मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखच्या ‘माऊली’ या आगामी चित्रपटाची सर्वांनाच उत्सुकता होती. ‘माऊली’ चित्रपटातील रितेशचा भन्नाट लूक रिलीज झाल्यापासून चाहते चित्रपटाची पहिली झलक पाहण्यासाठी आतुर होते. मात्र, आता ही प्रतिक्षा संपली असून ‘माऊली’ चित्रपटाचा टिझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. १ मिनीट २४ सेकंदांचा हा टिझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. टिझरची सुरुवातच विठ्ठलाच्या गाण्यापासून होते. त्यानंतर ‘आपलं नाव ऐकलं नाय, असं एक बी गाव नाय अन् हाणल्या बगैर सोडलं तर माऊली आपलं नाव नाही,’ असा डायलॉग मारत रितेश देशमुख अर्थात ‘माऊली’ची भन्नाट एंट्री होते. रितेशच्या याच लूकला आणि संपूर्ण टिझरला सोशल मीडियावर प्रेक्षकांची भरभरुन पसंती मिळते आहे. ‘लई भारी’ चित्रपटातील जुनं ‘माऊली’ हेच पात्र रितेशने पुढे नेत ते ‘माऊली’ चित्रपटात साकारलं आहे. ‘लय भारी’सारख्या सुपरहिट चित्रपटानंतर आता रितेश आपला दुसरा मराठी चित्रपट ‘माऊली’ प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहे. रितेश देशमुखची पत्नी जिनेलिया डिसूजाने माऊली चित्रपटाची निर्मिती केली आहे.


वाचा: शाहरुख म्हणतोय रितेश लय भारी!

जुन्या माऊलीची नवीन गोष्ट

‘माऊली’ चित्रपटात रितेश ‘लई भारी’मधल्या माऊलीचं पात्र साकारत असला तरी, नवा ‘माऊली’ सिनेमा लई भारीचा सिक्वेल किंवा प्रिक्वेल नाही. ‘माऊली’ हे नाव आणि पात्र वगळता या दोन्ही सिनेमांचा काहीच थेट संबंध नसल्याचं बोललं जात आहे. तर दुसरीकडे नवा माऊली सिनेमा लई भारीची फ्रेन्चाइजी असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमात अभिनेत्री सयामी खेर रितेश देशमुखसोबत मुख्य भूमिकेत दिसेल. फास्टर फेणे सिनेमाचा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार माऊलीचं दिग्दर्शन करणार असून, सिनेमामध्ये अजय-अतुलचं संगीत असेल. हा चित्रपट १४ डिसेंबर रोजी संपूर्ण माराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

रितेशच्या ‘माऊली’ लूकला प्रेक्षकांची पसंती

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here