घरमनोरंजनतृतीयपंथी आता गाजवणार 'कोक स्टुडिओ'

तृतीयपंथी आता गाजवणार ‘कोक स्टुडिओ’

Subscribe

'कोक स्टुडिओ'च्या या नव्या प्रोमोच्या निमित्तानं हा प्रशंसनीय बदल असून कलाविश्वात एक नवी पहाट झाल्याचं मत नेटिझन्सनं मांडल्याचं दिसत आहे. 'एक राष्ट्र, एक आत्मा, एक ध्वनी' अशी या प्रोमोची थीम आहे. तृतीयपंथी कलाकारांचा सहभाग हा स्तुत्य भाग आहे.

‘कोक स्टुडिओ’ हा असा कार्यक्रम आहे ज्यानं संगीतप्रेमींना एक चांगला प्लॅटफॉर्म मिळवून दिला आहे. या कार्यक्रमामध्ये गाण्यांना वेगळं आणि तितकंच प्रभावीपणे सादर करण्यात येतं. भारतीय आणि पाकिस्तानी कलाकारांचे विविध पैलू या कार्यक्रमातून दिसून येत असतात. या कार्यक्रमाला खूप जास्त प्रसिद्धी आहे. तर अशा शो नं पुन्हा आपलं वेगळं अस्तित्व दाखवून दिलं आहे ते नव्या प्रोमोमधून. ‘पाकिस्तान कोक स्टुडिओ’नं एक नवा प्रोमो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये तृतीयपंथी कलाकारांचा सहभाग करण्यात आला आहे.

काय आहे नव्या प्रोमोमध्ये?

साधारण अडीच मिनिटांच्या या नव्या प्रोमोमध्ये दोन तृतीयपंथी कलाकारांचा समावेश करण्यात आला आहे. नगमा आणि लकी असं या दोन्ही तृतीयपंथी कलाकारांचं नाव असून ‘जो भी मैं हूँ, और तुम भी हो’ अशा गाण्याच्या ओळी गात आपल्या कलेमधून लोकांपर्यंत एक आर्तता पोहचवली आहे. ‘कोक स्टुडिओ’च्या या नव्या प्रोमोच्या निमित्तानं हा प्रशंसनीय बदल असून कलाविश्वात एक नवी पहाट झाल्याचं मत नेटिझन्सनं मांडल्याचं दिसत आहे. ‘एक राष्ट्र, एक आत्मा, एक ध्वनी’ अशी या प्रोमोची थीम आहे. या प्रोमोमधून समाजाला एक चांगला संदेश देण्याचं पाऊल उचण्यात आल्याचं दिसत आहे. दरम्यान, तृतीयपंथी कलाकारांनी सादर केलेली ही कला म्हणजे समाजाला एक वेगळा आणि सकारात्मक संदेश देण्यात आल्याचंही नेटिझन्सनं सोशल मीडियावर म्हटलं आहे. या प्रोमोमधून नक्कीच एक योग्य आणि उत्कृष्ट संदेश लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी मदत झाली आहे. त्यामुळं पुढे आता ‘कोक स्टुडिओ’ संगीतप्रेमींसाठी काय नवीन घेऊन येणार याकडे प्रेक्षकांचं नक्कीच लक्ष लागून राहील.

- Advertisement -

&nbsp

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -