प्रसाद ओक राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर नाराज?

Mumbai
Prasad Oak
प्रसाद ओक

गुरूवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर होते. त्यानंतर त्यांची तब्बल 9 तास कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर राज ठाकरें एवढीच आणखी एका व्यक्तीची चर्चा आहे. तो म्हणजे अभिनेता प्रसाद ओकची. या घटनेनंतर अभिनेता प्रसाद ओक याने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला असून सोशल मीडियावर त्याची चांगलीच चर्चा होत आहे.

View this post on Instagram

Thinking about EDiots…😜

A post shared by Prasad Oak (@oakprasad) on

प्रसादने राज ठाकरे यांच्या अंदाजातील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो पाहून तुम्हाला राज ठाकरेची आठवण येईल. हा फोटो पाहून हुबेहूब राजच अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे. या फोटोची चर्चा होण्याचे मुळ कारण म्हणजे या फोटोला असणारं कॅप्शन. ‘Thinking About EDitos’ असं कॅप्शन प्रसादने या फोटोला दिलं आहे.

ईडीच्या चौकसीनंतर प्रसाद ओकने ईडीला हा टोणा मारलाय हे नक्की. सोनाली कुलकर्णी, अमेय वाघ, प्राजक्ता माळी यांसारख्या कलाकारांनी या पोस्टला लाइक केलं आहे. ‘वा वा.. अतिशय मार्मिक’ अशी कमेंट प्राजक्ता माळीने या पोस्टवर दिली आहे. तर सोनाली कुलकर्णीनेही उपरोधिक हसल्याचा इमोजी पोस्ट केला आहे.
आजपर्यंत राज ठाकरे यांच्या ईडी चौकशीला काँग्रेसपक्षाने विरोध केला होता. आता कलाकारही नकळत पमे याला विरोध करत आहेत.