तरूण चाहत्याच्या निधनाने रणवीर भावूक; शेअर केली भावनिक पोस्ट

पोस्ट शेअर करताना रणवीरने 'RIP Lil Homie.'असे लिहून आपल्य़ा चाहत्याच्या निधनाचे दुःख व्यक्त केले

Mumbai

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने आपल्या चाहत्याकरिता नुकतीच एक पोस्ट केली. रणवीर सिंगच्या तरूण चाहत्याचे आकस्मित निधन झाले. रणवीरचे जगभरात अनेक चाहते आहेत. रणवीर नेहमीच आपल्या चाहत्यांसोबत आपुलकीने तसेच मैत्रीच्या नात्याने वागत असल्याने प्रत्येकालाच रणवीर सिंग हा आपलासा वाटतो. अशाच चाहत्यांपैकी एक असणाऱ्या तरूण चाहत्याचा आकस्मित मृत्यू झाला. या चाहत्याचं नाव जतिन दुलेरा असून तो रणवीरचा मोठा चाहता होता.

ऑफिसची तयारी करत असताना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं जतिन घरीच कोसळल्याने त्याचा मृत्यू झाल्या, अशी माहिती समोर येत आहे. रणवीरला ही गोष्ट कळताच त्याने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर जतिनसोबतचे फोटो शेअर केले. जतिनच्या आकस्मित निधनाने रणवीर भावूक होऊन त्याने श्रद्धांजली वाहिली आहे.

View this post on Instagram

Gone too soon bro 🙏. An ardent #ranveersingh fan #JatinDulera died today out of a sudden accident. He was just getting ready to go to office and collapsed in his bathroom as his breathing stopped. Jatin was happy teen who was not into any bad habbits whatsoever. He had lost his father at a very early age and has two younger siblings. His mom works in a government firm and he worked in the building where #farhanakhtar has his office in bandra. One of my followers, he often tipped me about celebs whereabouts and sometimes even contributed videos to me but never wanted me to credit him. He also had asked me if he could join me. His funeral took place at Shivaji Park where around 700 friends of his turned up. Keep smiling Jatin like you always did, we will miss you #rip @iamjatin_753

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

सोमवारी रणवीर सिंगने इंस्टाग्रामवर काही फोटोंचे कोलाज शेअर केले आहे. ज्यामध्ये रणवीर आपल्या चाहत्यासह दिसतोय. मात्र या फोटोला देण्यात आलेल्या कॅप्शनला बघून रणवीरचे चाहते देखील दुःखी झाले आहे. ही पोस्ट शेअर करताना रणवीरने ‘RIP Lil Homie.’असे लिहून आपल्य़ा चाहत्याच्या निधनाचे दुःख व्यक्त केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here